विद्यार्थ्याने शिक्षिकेला लिहिलं लव्ह लेटर, पण वडिलांनी केला वेगळाच दावा

नववीच्या विद्यार्थ्याने वर्ग शिक्षिकेला लिहिलं लव्ह लेटर

Updated: Nov 26, 2018, 04:16 PM IST
विद्यार्थ्याने शिक्षिकेला लिहिलं लव्ह लेटर, पण वडिलांनी केला वेगळाच दावा title=

नवी दिल्ली : पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेमध्ये नववीच्या विद्यार्थ्याने त्याच्या वर्ग शिक्षिकेला लव्ह लेटर लिहिल्याने एकच वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्याने मित्राच्या मदतीने लव्ह लेटर शिक्षिकेच्या टेबलवर ठेवलं. शिक्षिकेने जेव्हा ते टेलर वाचलं तेव्हा शिक्षिका चांगलीच हैराण झाली. शिक्षिकेला समजत नव्हतं की हे पत्र कोणी लिहिलं आहे. पण शिक्षिकेने सगळ्या विद्यार्थ्यांचं अक्षर तपासल्यानंतर विद्यार्थ्याचा शोध लावला.

होशियारपूर जिल्ह्यातील माहिलपूरमधील एका शाळेतील हा प्रकार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लेटर वाचल्यानंतर रागात असलेल्या शिक्षिकेने याची तक्रार मुख्यध्यापक आणि शाळेच्या मॅनेजमेंटकडे केली. त्यानंतर मुख्यध्यापकांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखत पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी जेव्हा ही माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली तर ते ही हैराण झाले. पालकांनी विद्यार्थ्याला शिक्षिकेची माफी मागण्यास सांगितली. पण यानंतर मुख्यध्यापकाने विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकलं. पण यानंतर सगळं प्रकरण मिटलं असा विचार करत असताना या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्यासाठी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलं. वडिलांनी तक्रार केली की 2 शिक्षकांनी त्यांच्या मुलाला कोणतंही कारण नसताना शाळेतून काढून टाकलं. दोघेही शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीत असा आरोप देखील करण्यात आला आहे. शाळेत पुन्हा प्रवेश देण्य़ासाठी मुख्यध्यापकांना देखील पत्र लिहिलं आहे. पण मुख्यध्यापकांनी म्हटलं की, विद्यार्थ्याने ज्याप्रकारे शिक्षिकेबद्दल भाषेचा वापर केला आहे. ते पाहता विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार नाही.