बेळगावात किरण ठाकूर यांच्या घरावर दगडफेक

Updated: May 16, 2018, 05:16 PM IST

बेळगाव : बेळगावमधील मराठी भाषकांमधील वाद अजून धुमसतोच आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडाला. या रागातून किरण ठाकूर यांच्या घराव अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचं समजतंय.

किरण ठाकूर यांच्या घरावर दगडफेक करून फटाक्यांच्या माळा फेकण्यात आल्या. 

या हल्ल्यात किरण ठाकूर यांच्या घराच्या काचा फुटल्या. या प्रकारानंतर किरण ठाकूर यांचं घर आणि कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.