Share Market | शेअर बाजारात भूकंप; सेंसेक्स तब्बल 1400 अंकानी आदळला

शुक्रवारी शेअर बाजारांची सुरुवात घसरणीने झाली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्सची1350 अंकांनी घसरण झाली.

Updated: Nov 26, 2021, 11:47 AM IST
Share Market | शेअर बाजारात भूकंप; सेंसेक्स तब्बल 1400 अंकानी आदळला title=

मुंबई :  शुक्रवारी शेअर बाजारांची सुरुवात घसरणीने झाली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्सची1350 अंकांनी घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स इंडेक्स 720 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) निफ्टीची स्थिती कमी-अधिक प्रमाणात तशीच राहिली आहे.

शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीने उघडला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा सेन्सेक्स निर्देशांक 720 अंकांपेक्षा जास्त घसरणीसह उघडला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या निफ्टीची स्थितीही कमी-अधिक प्रमाणात तशीच राहिली.

जगातील अनेक भागांमध्ये कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव हे यामागील एक प्रमुख कारण आहे. धस्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्याचे दिसून आले.

सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही ठिकाणी फक्त फार्मास्युटिकल कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले. तर ऑटो मोबाइल, पोलाद, वित्त आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे शेअर घसरत राहिले.

सेन्सेक्समध्ये मोठी घसरण
शेअर बाजार सुरू होण्यापूर्वी खुल्या सत्रातच सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बाजार उघडला तेव्हा तो सुमारे 720 अंकांनी घसरला आणि 58,075.93 अंकांवर उघडला.

तर गुरुवारी सेन्सेक्स 58795.09 अंकांवर हिरव्या निशानासह बंद झाला

निफ्टीचीही अवस्था वाईट 
त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाची स्थितीही वाईट होती. निफ्टीची सुरुवातही कमकुवत झाली आणि तो सुमारे 250 अंकांच्या घसरणीसह 17,338.75 अंकांवर उघडला.

तर गुरुवारी तो 17535.25 अंकांवर बंद झाला. सकाळच्या व्यवहारात निफ्टीने 420 हून अधिक अंकांची घसरण नोंदवली आहे.