शेअर बाजाराची या आठवड्यात कशी असेल चाल; कोणत्या स्टॉक्स एक्सपर्ट्सची नजर, वाचा

 निफ्टीसाठी 18000 च्या लेवलवर इमेडिएट रेजिस्टंस आहे तर, 18000 ते 18200 च्या लेवलवर एकदा पुन्हा विक्री दिसून येऊ शकते. अनेक असे फॅक्टर आहेत ज्यांचा परिणाम बाजारावर होऊ शकतो.

Updated: Nov 7, 2021, 03:25 PM IST
शेअर बाजाराची या आठवड्यात कशी असेल चाल; कोणत्या स्टॉक्स एक्सपर्ट्सची नजर, वाचा title=

मुंबई : येणाऱ्या आठवड्यात दिवाळीनंतर बाजारा पॉझिटिव नोडमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. शॉर्टटर्ममध्ये सेलिंग प्रेशर दिसून येऊ शकतो. निफ्टीसाठी 18000 च्या लेवलवर इमेडिएट रेजिस्टंस आहे तर, 18000 ते 18200 च्या लेवलवर एकदा पुन्हा विक्री दिसून येऊ शकते. अनेक असे फॅक्टर आहेत ज्यांचा परिणाम बाजारावर होऊ शकतो.

स्वस्तिका इनवेस्टमेंट लिमिटेडचे रिसर्च हेड संतोष मीना यांचे म्हणणे आहे की, पुढील आढवड्यात फॉरेन इंस्टिट्युशनल इन्वेस्टर्सची चाल काय असेल यावर बाजाराची नजर असेल. गेल्या काही दिवसांपासून फॉरेन इंस्टिट्युशनल इन्वेस्टर्स मोठ्या प्रमाणावर विक्री करीत आहेत. अशातच त्यांची चाल या आठवड्यातही महत्वाची ठरू शकते. या आठवड्यातही त्यांनी बाजारातून पैसा काढला तर बाजारात आणि करेक्शन वाढू शकते. तसेच अमेरिका आणि चीनचे महागाईचे आकडे येणार आहेत. जे या आठवड्यातील महत्वाचे फॅक्टर आहेत. 

कोणत्या सेक्टरवर असणार नजर
संतोष मीना यांचे म्हणणे आहे की, चांगल्या कमाईनंतरदेखील काही शेअर्समध्ये ऍक्शन दिसून येऊ शकते. यामध्ये मुथूट फायनान्स, सन टीव्ही, डीवीस्लॅब, Aurobindo pharma, ब्रिटानिया आणि M&M वर नजर राहणार आहे. FMCG आणि ऑटो सेक्टर चांगल्या पोजिशनमध्ये दिसून येत आहे. याशिवाय शिपिंग आणि टेक्सटाइल सेक्टरमध्येदेखील ऍक्शन दिसू शकते.  शॉर्टटर्ममध्ये बाजारात सेल ऑन राईजचा ट्रेंडची शक्यता आहे.

बँक निफ्टीसाठी 39750 च्या लेवलवर रेजिस्टंस आहे. तो ब्रेक झाल्यास इंडेक्स 40250 ते 40500 पर्यंत पोहचू शकतो. तसेच इंडेक्सला खाली 39500 ते 39250 च्या लेवलवर सपोर्ट आहे.

शॉर्ट टर्म कॉल

Titan

टारगेट: 2600 रुपये
स्टॉप लॉस: 2385 रुपये
अवधि: 2-3 दिवस
सल्ला: मोतीलाल ओसवाल

Laxmi Organic
एंन्ट्री 419-425 रुपये
टारगेट: 465 रुपये
स्टॉप लॉस: 414 रुपये
अवधी: कमाल 2 आठवडे

Glenmark Pharma

एंट्री: 518-523 रुपये
टारगेट: 562 रुपये
स्टॉप लॉस: 510 रुपये
अवधी: कमाल 2 आठवडे

Vimta Labs
एंट्री: 357-360 रुपये
टारगेट: 393 रुपये
स्टॉप लॉस: 349 रुपये
अवधी: अधिकतम 2 आठवडे

सल्ला : Axis Direct