मुंबई : एसबीआय (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआय 1 जुलैपासून नवे नियम लागू करत आहे. एसबीआय सेवा शुल्कांमध्ये बदल करत आहेत. यामध्ये एटीएममधून पैसे काढणे, तसेच चेकबूक आणि इतर सेवांवर हे सेवा शुल्क आकारण्यात येणार आहेत. एसबीआयचे हे नवे नियम केवळ BSBD म्हणजेच (Basic Savings Bank Deposit) बचत खात्यांसाठीच असणार आहेत. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर BSBD म्हणजेच Zero-Balance Account. म्हणजेच या सेवा शुल्काचा फटका हा सर्वसामन्यांना बसणार आहे. (State Bank of India will charge service charges on Basic Savings Bank Deposit from July 1)
काय आहेत नियम?
या नियमांनुसार, बचत खातेधारकांना केवळ 4 वेळाच एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. यामध्ये एटीएम आणि बॅंकेतून काढण्यात आलेल्या रक्कमेचा समावेश असणार आहे. यानंतर प्रत्येक व्यवहारावर खातेधारकांना अधिक 15 रुपये मोजावे लागणार आहे. हे सेवा शुल्क एटीएम तसेच बॅंकेतून केलेल्या व्यवहारांवर लागू असणार आहेत.
बेसिक अकाऊंट सुरु करणाऱ्या ग्राहकांना बॅंकेकडून 10 पानी चेकबूक मोफत देण्यात येणार आहे. या सेवेसाठी मर्यादा ही एका वित्त वर्षाची असणार आहे. यानंतर खातेधारकांना यासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागतील. दरम्यान NEFT, IMPS आणि RTGS या सारखे व्यवहार हे निशूल्क असणार आहेत.
असे असतील सेवा शुल्क
एखाद्या ग्राहकाने एका वित्त वर्षात 10 पानी फ्री चेकबूकपेक्षा अधिक 10 पानाचं चेकबूक घेतलं, तर त्याला 40 रुपये मोजावे लागतील. तसेच 25 पानी चेकबूकसाठी 75 रुपये सेवाशुल्क द्यावे लागतील. तसेच अत्यावश्यक सेवेनुसार 10 पानांसाठी 50 रुपये द्यावे लागतील. या शुल्कांवर जीएसटी (GST) आकारला जाणार आहे.
मात्र या सर्व शुल्कातून वरिष्ठ नागरिकांना (Senior Citizen) वगळण्यात आले आहे. म्हणजेच हे दर वरिष्ठ नागरिकांना लागू होणार नाहीत. बचत खात्यासह बॅंक खातेधारकांना RuPay कार्ड देते. यासाठी कोणतेही शूल्क आकारले जात नाहीत.
SBI ने शुल्काच्या नावाखाली जमवले काही कोटी
गेल्या काही दिवसांपासून बचत खात्यांमधून सेवा शुल्काच्या नावाखाली काही रक्कम वजा केली जात आहे. यासंदर्भात एक वृत्त समोर आले आहे. आयआयटी मुंबईने (IIT Mumbai) या संदर्भात रिपोर्ट सादर केला आहे.
आयआयटी मुंबईच्या या रिपोर्टनुसार, देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक आणि इतर काही बँका सर्वसामन्यांच्या खात्यातून सेवा शुल्क कापून तगडी कमाई करत आहेत. एसबीआयने गेल्या 6 वर्षांमध्ये सेवाशुल्काच्या नावाखाली बचत खात्यातून तब्बल 308 कोटी रुपये कमावले आहेत. एसबीआयचे एकूण ग्राहकांपैकी 12 कोटी बचत खातेधारक आहे. तसेच पंजाब नॅशनल बॅंकेत (Punajab National Bank) 3 कोटी 90 लाख बचत खातेधारक आहेत. PNB ने सेवा शुल्काच्या नावाखाली 9 कोटी 90 लाख रुपयांची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या :
SBI ग्राहकांना अलर्ट, 30 जूनपर्यंत हे काम केले नाही तर येणार मोठी अडचण