दिवाळीत पैशांची चणचण SBI करणार दूर

दिवाळीसाठी सर्वत्र बाजार फुलल्याचं पहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात तुमच्याकडे पैशांची कमी झाली तर काळजी करु नका. कारण, एसबीआयने तुमच्यासाठी एक खास ऑफर दिली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 6, 2017, 02:14 PM IST
दिवाळीत पैशांची चणचण SBI करणार दूर  title=

नवी दिल्ली : दिवाळीसाठी सर्वत्र बाजार फुलल्याचं पहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात तुमच्याकडे पैशांची कमी झाली तर काळजी करु नका. कारण, एसबीआयने तुमच्यासाठी एक खास ऑफर दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) एक खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरनुसार तुम्हाला गरज पडल्यास लहान-मोठं कर्ज त्वरीत उपलब्ध मिळणार आहे.

एसबीआय फेस्टिव्ह लोन अंतर्गत तुम्हाला ५००० रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळु शकतं. या कर्जाची परतफेड तुम्ही १२ महिन्यांच्या ईएमआय (हफ्ता) ने भरु शकता. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, जर तुम्ही कर्जाची पूर्ण रक्कम वेळेवर भरली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे जास्त शुल्क द्यावं लागणार नाही. म्हणजेच तुमच्या कर्जावर बँक प्रीपेमेंट शुल्क घेणार नाही.

या ऑफरनुसार तुम्हाला कमीत कमी ५००० रुपये कर्ज मिळू शकतं. तर अधिकाधिक कर्ज घेण्यासाठी एक नियम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच तुमचं मासिक उत्पन्नाच्या आधारावर तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे.

आवश्यक कागदपत्र:

तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ, सॅलरी स्लिप आणि फॉर्म १६ जमा करावा लागेल. तसेच तुमचा व्यवसाय असेल तर, तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट सर्टिफिकेट, टेलिफोन बिल, आयटी रिटर्नची माहिती द्यावी लागणार आहे.