एसबीआय खातेधारकांनो हे काम आत्ताच पूर्ण करा, नाहीतर.....

 स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 

Updated: Sep 10, 2021, 08:33 PM IST
एसबीआय खातेधारकांनो हे काम आत्ताच पूर्ण करा, नाहीतर.....  title=

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने (SBI) ग्राहकांना लवकरात लवकर आधार  (Aadhaar Card)आणि पॅन कार्ड (PAN) लिंक करण्याचं आवाहन केलंय. एसबीआयने खातेधारकांना आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. म्हणजेच खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत आधारसह पॅन लिंक करावं लागेल. खातेधारकांनी दिलेल्या मुदतीत हे काम उरकलं नाही, तर त्यांना सीमलेस बँकिग सुविधेचा लाभ घेता येणार नाही. (state bank of india his appeal to account holders to link aadhar and pan card link till 30 september 2021)  
 
बँकेने दिलेल्या या मुदतीच्या आत ग्राहकांनी आधार-पॅन लिंक न केल्यास, 234H नुसार 10 हजारांचा दंड भरावा लागू शकेल. इतकंच नव्हे तर पॅन कार्डही डीएक्टीव्हेट होईल. आयकर विभागाने पॅन-आधार लिंक करणं बंधनकारक केलंय. CBDT आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख ही याआधी 30 जून होती. मात्र यात पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.  
 
आधार-पॅन लिंक कसं करायचं?

दोन प्रकारे आधार-पॅन करता येईल. आधार-पॅन लिंक एसएएस किंवा आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुनही (Income Tax Department Website)  लिंक करता येईल. एसएमएसद्वारे लिंक करण्यासाठी कॅपिटलमध्ये UIDPN असा मेसेज टाईप करावा. त्यानंतर स्पेस देऊन 12 अंकी आधार कार्ड टाईप करावा. यानंतर पुन्हा स्पेस दिल्यानंतर 10 अंकी पॅन नंबर टाईप करावा. त्यानंतर हा मेसेज  567678 किंवा 56161 पाठवाव. अशाप्रकारे आधार-पॅन लिंक करता येईल.