सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; घ्या गलेलठ्ठ पगार

कर्मचारी चयन आयोगाने सब इंस्पेक्टर आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर या पदांसाठी भरती सुरू केली आहे. 

Updated: Mar 25, 2018, 11:22 AM IST
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; घ्या गलेलठ्ठ पगार title=

मुंबई : कर्मचारी चयन आयोगाने सब इंस्पेक्टर आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर या पदांसाठी भरती सुरू केली आहे. तर त्यास पात्र असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. ही भरती १,२३३ पदांसाठी असेल. या भरतीसाठी कर्मचारी चयन आयोगाने नोटीफिकेशन जाहिर केले आहे. तुम्हीही इच्छुक असाल तर या पदांसाठी आवेदन करु शकता. 

SSC भरती २०१८ पदे

  • विभाग- कर्मचारी चयन आयोग
  • पदाचे नाव- सब इंस्पेक्टर आणि असिस्टेंट सब इंस्पेक्टर
  • एकूण पदांची संख्या- १२३३ पदे
  • वेतन- ३५,४०० रुपयांपासून ते १,१२,४०० रुपये प्रती महिना

SSC भरती २०१८ साठी योग्यता

  • शैक्षणिक योग्यता- कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेज किंवा संस्थेतून पदवी असणे गरजेचे.
  • वयोमर्यादा- कमीत कमी २० वर्ष आणि जास्तीत जास्त २५ वर्ष
  • राष्ट्रीयत्व- भारतीय
  • निवड प्रक्रीया- विद्यार्थ्यांची निवड परिक्षा आणि प्रमाणपत्रची पडताळणी करुन केले जाईल.
  • नियुक्ती स्थान- संपूर्ण भारत.

अशाप्रकारे करा अर्ज

योग्य अभ्यार्थी SSC भरती २०१८ साठी ssc.nic.in या वेबसाईटवर जाऊन विस्तृत माहिती प्राप्त करा. 

महत्त्वाच्या तारखा

  • नोटिफिकेशन जाहिर केल्याची तारीख- ३ मार्च २०१८
  • आवेदन करण्याची तारीख- ३ मार्च २०१८ 
  • आवेदन करण्याची अंतिम तारीख- 2 एप्रिल 2018