हजार रुपयांच्या सायकलवरून लाखोंची तस्करी!

भारत - नेपाळच्या सीमेवर तस्करी होत असल्याचं उघड झालंय. सशस्र सीमा दलाच्या जवानांनी ही कारवाई केलीय. 

Updated: Aug 8, 2017, 08:55 PM IST
हजार रुपयांच्या सायकलवरून लाखोंची तस्करी! title=

देहरादून : भारत - नेपाळच्या सीमेवर तस्करी होत असल्याचं उघड झालंय. सशस्र सीमा दलाच्या जवानांनी ही कारवाई केलीय. 

हजार रुपयांच्या एका साध्या दिसणाऱ्या सायकलवर भारत - नेपाळ बॉर्डरवर लाखो रुपयांची तस्करी सुरू होती. या सीमेवर सशस्र सीमा दलाच्या ५७ व्या वाहिनीचे जवान सोमवारी रात्री पेट्रोलिंगवर होते. यावेळी त्यांना एक व्यक्ती सायकलवर काही सामान घेऊन जाताना दिसला. 

या व्यक्तीच्या संशयास्पद हालचालींनी जवानांचं लक्ष त्याच्यावर गेलं. सशस्र सीमा दलाच्या जवानांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न कला. परंतु, यामुळे त्या व्यक्तीनं सामान जागेवरच सोडून पळ काढला. 

दाट जंगलात रात्रीचा काळोख आणि जोराचा पाऊस सुरू असल्यानं या व्यक्तीला पकडण्यात जवानांना अपयश आलं. परंतु, सायकलवरून नेण्यात येणाऱ्या सामानामध्ये जवानांना परदेशी कॉस्मेटिक्स मिळाले. याची किंमत जवळपास २,३४,००० हजार रुपये असल्याचं समजतंय.