कोरोनाच्या नाशासाठी स्पुतनिक वी लस सज्ज; रशियन विमानाने दुसरी खेप भारतात दाखल

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या दरम्यान भारतात रशियाच्या स्पुतनिक वी लशीची दुसरी बॅच दाखल झाली आहे. आज सकाळी विमानाने या लशी हैद्राबाद येथे आल्या आहेत.

Updated: May 16, 2021, 11:03 AM IST
कोरोनाच्या नाशासाठी स्पुतनिक वी लस सज्ज; रशियन विमानाने दुसरी खेप भारतात दाखल title=

हैद्राबाद : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या दरम्यान भारतात रशियाच्या स्पुतनिक वी लशीची दुसरी बॅच दाखल झाली आहे. आज सकाळी विमानाने या लशी हैद्राबाद येथे आल्या आहेत.

रशियाच्या राजदूत एन.कुदाशेव यांनी म्हटले आहे की, 'कोरोनाविरोधातील लढाईत स्पुतनिक लस मोठी निर्णायक भूमिका बजावत आहे. संपूर्ण जगाला माहितीये की, रशियात 2020 पासून लोकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जात आहे'. 

रशियाची स्पुतनिक वी लशीचे लवकरच भारतात निर्माण सुरू होणार आहे. 85 कोटी वॅक्सिनचे दरवर्षी निर्माण करण्यात येणार आहे. तसेच लवकरच सिंगल डोस लस सुद्धा निर्माणाकडे रशियाने लक्ष केंद्रीत केले आहे.

भारतात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणारी स्पुतनिक वी ही पहिलीच  विदेशी लस आहे. स्पुतनिक वी लस हैद्राबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटिजकडून बाजारात आणली जाणार आहे. 

स्पुतनिक लसीची किंमत 1000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात ही लस बाजारात येण्यास सज्ज असणार आहे.