आठ राज्यात कोरोनाचा बेफाम फैलाव; रुग्णांच्या संख्येत कित्येक पटींनी वाढ

देशातील आठ राज्यांमध्ये कोव्हिड रुग्णांची सर्वाधिक वाढ गेल्या २४ तासात नोंदवली गेली आहे

Updated: Apr 4, 2021, 08:49 AM IST
आठ राज्यात कोरोनाचा बेफाम फैलाव; रुग्णांच्या संख्येत कित्येक पटींनी वाढ title=

 नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र गतीने फैलावत आहे. देशातील आठ राज्यांमध्ये कोव्हिड रुग्णांची सर्वाधिक वाढ गेल्या २४ तासात नोंदवली गेली आहे. त्यातच महाराष्ट्राची रुग्णसंख्या ९ पटीने वाढली आहे.

  देशात एकूण आठ राज्यात करोना रुग्णांतील दैनंदिन वाढ सर्वाधिक म्हणजे ८१.४२ टक्के इतकी नोंदवली गेलीय. 
 
 महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यात करोना संसर्गाचा दर जास्त आहे. 
 
 भारतात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या ६ लाख ५८ हजार ९०९ पर्यंत वाढलीय. एकूण रुग्णांच्या हे प्रमाण ५.३२ टक्के आहे. 
 
 पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, बेंगळुरू शहर, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर, नांदेड या जिल्ह्य़ात उपचाराधीन रुग्णांच्या पन्नास टक्के रुग्ण आहेत. 
 
 महाराष्ट्रात रुग्ण संख्या ९ पट वाढली असून दोन महिन्यातली ही सर्वाधिक वाढ आहे.