स्पाइसजेटची रिपब्लिक डे ऑफर, फक्त ७६९ रुपयांमध्ये हवाई सफर

प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कॉमर्स कंपन्यांपासून विमान कंपन्यां भरघोस डिस्काऊंट देत आहेत.

Updated: Jan 22, 2018, 04:15 PM IST
स्पाइसजेटची रिपब्लिक डे ऑफर, फक्त ७६९ रुपयांमध्ये हवाई सफर  title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कॉमर्स कंपन्यांपासून विमान कंपन्यां भरघोस डिस्काऊंट देत आहेत. विस्तारा, एअर एशिया, गो एअर, इंडिगोनंतर आथा स्पाइसजेटही विमान प्रवासासाठी ऑफर घेऊन आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ७६९ रुपयांमध्ये स्पाइसजेटच्या विमानामधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

४ दिवसांसाठी मिळणार ऑफर

'ग्रेट रिपब्लिक डे सेल' या नावानं स्पाइसजेटनं ही ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये भारतामध्ये विमान प्रवासासाठी ७६९ रुपयांचं तिकीट तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी २,४६९ रुपयांमध्ये तिकीट मिळणार आहे. ही ऑफर २२ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत सुरु असून १२ डिसेंबरपर्यंत विमानानं प्रवास करता येणार आहे.

प्रोमो कोड वापरावा लागणार

भारतामध्ये विमान सेवा देण्याऱ्या कंपन्यांमध्ये स्पाइसजेट तिसरी सगळ्यात मोठी कंपनी आहे. मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही स्पाइसजेटच्या या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. यासाठी REP69 हा प्रोमो कोड वापरावा लागणार आहे.

ग्रुप बुकिंगवर मिळणार नाही ऑफर

स्पाइसजेटच्या या ऑफरमध्ये कंपनीची दुसरी कोणतीही ऑफर घेता येणार नाही. तसंच ग्रुप बुकिंगवरही ही ऑफर लागू होणार नाही. तसंच ठराविक तिकीटांसाठीच ही ऑफर असणार आहे.

इकडून बूक करा तिकीट

स्पाइसजेटची वेबसाईट, मोबाईल ऍप, ट्रॅव्हल पोर्टल आणि बुकिंग एजंटच्या मार्फत स्पाइसजेटचं तिकीट बूक करता येईल. मोबाईल ऍपवरून तिकीट बूक केलं तर आणखी डिस्काऊंट मिळेल, असं कंपनीनं सांगितलं आहे.