राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी चार वर्षात आला एवढा खर्च

२०१६-१७ मध्ये ४८.३५ कोटी आणि२०१७-१८ मध्ये २७.११ कोटी रुपये खर्च केले आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 20, 2017, 11:07 AM IST
राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी चार वर्षात आला एवढा खर्च title=

लखनौ : गेल्या चार वर्षांत राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांच्या पगारांवर १५५.४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये ३८.१७ कोटी रुपये २०१५-१६ मध्ये ४१.७७ कोटी,२०१६-१७ मध्ये ४८.३५ कोटी आणि२०१७-१८ मध्ये २७.११ कोटी रुपये खर्च केले आहेत. आरटीआय कार्यकर्ते डॉ. नूतन ठाकूर यांनी प्राप्त केलेल्या माहितीमध्ये ही माहिती समोर आली आहे.

गेल्या चार वर्षात राष्ट्रपतींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या गाड्यांच्या देखभाल, देखरेखीसाठी ६४.९ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.२०१४-१५ मध्ये, १५.५ लाख रुपये २०१५-१६ मध्ये २० लाख, २०१६-१७ मध्ये २१.८ लाख आणि २०१७-१८ मध्ये ७.५ लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही यामध्ये पेट्रोलवर झालेल्या खर्चाचा समावेश नाही. कारण सरकारी पेट्रोल पंपमधूनच यासाठी पेट्रोल मिळत असते.

राष्ट्रपतींच्यासोबत एकूण किती गाड्या तसेच सुरक्षा कर्मचारी असतात याची माहिती सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देता येत नसल्याची माहिती डीसीपी, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून मिळाल्याचे नूतन यांनी सांगितले.