स्पेस पिकनिक कशी असते? भारतीयाने दाखवला पहिल्या-वहिल्या अंतराळ टूरचा Video

लवकरच मानवाला थेट अंतराळात पिकनिकचा आनंद लुटता येणार आहे. कशी असेल ही स्पेस टूर याचा व्हिडिओ भारतीयाने शेअर केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 21, 2024, 04:42 PM IST
स्पेस पिकनिक कशी असते? भारतीयाने दाखवला पहिल्या-वहिल्या अंतराळ टूरचा Video title=

Blue Origin Resumes Space Tourism : मनावाचे अंतराळात टूरवर जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकाराले आहे. रविवारी एका खासगी यान स्पेस टूरवर गेले.   ब्लू ओरिजीन कंपनीच्या मोहिमेतून जगभरातील सहा जण या स्पेस टूरमध्ये सहभागी झाले होते. गोपी थोटाकुरा (Gopi Thotakura) हे अंतराळ प्रवास करणारे दुसरे तर स्पेस टूरवर जाणारे पहिले  भारतीय ठरले आहेत. गोपी थोटाकुरा यांनी  पहिल्या-वहिल्या अंतराळ टूरचा Video सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

मानवाला स्पेस टूर नेण्याचे ब्लू ओरिजीन कंपनीचे टार्गेट आहे. ब्लू ओरिजीन ही Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांची कंपनी आहे. NS-25 मिशन अंतर्गत ब्लू ओरिजीन कंपनीने सातव्या स्पेस टूरचे आयोजन केले होते.  रविवारी अमेरिकेतील टेक्सास येथील लॉन्च साइट वन येथून एका स्पेस शिपने अंतराळात उड्डाण केले. 

अंतराळ प्रवास करणारे दुसरे भारतीय 

NS-25 या स्पेस टूरमध्ये एंजेल, स्लेव्हन चिरॉन, एड ड्वाइट, केनेथ हेस, कॅरोल शालर आणि गोपी थोटाकुरा हे सहा अंतराळवीर सहभागी झाले होते. भारतीय लष्कराचे विंग कमांडर राकेश शर्मा 1984 मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते. राकेश शर्मा यांच्यानंतर गोपी थोटाकुरा हे  अंतराळ प्रवास करणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. तर, पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे गोपी थोटाकुरा हे पहिले भारतीय आहेत.   

गोपी थोटाकुरा यांनी शेअर केला स्पेसटूरचा व्हिडिओ

NS-25 या स्पेस टूरमध्ये सहभागी झालेल्या गोपी थोटाकुरा यांनी या रोमांचकारी सफरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. या स्पेस टूचमध्ये सहभागी होणे हा माझ्यासाठी आणि सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. या या व्हिडिओमध्ये गोपी थोटाकुरा हे 'इंडिया इन स्पेस' म्हणताना दिसत आहेत. त्यांनी हातात तिरंगा अर्थात भारतीय झेंडा देखील धरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 

कोण आहेत गोपी थोटाकुरा?

गोपी थोटाकुरा हे 30 वर्षांचे आहेत. ते एक उद्योजक आणि पायलट आहेत.  'प्रिझर्व्ह लाइफ कॉर्प' या अमेरिकेतील जागतिक केंद्राचे  गोपी थोटाकुरा हे सह-संस्थापक देखील आहेत. व्यावसायिक जेट उडवण्याव्यतिरिक्त, तो एरोबॅटिक विमाने आणि सी प्लेनटे उड्डाण त्यांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जेट पायलट म्हणूनही त्यांनी काम केले आहे.