काँग्रेस-जेडीएस नंतर आता हे 2 पक्ष देखील एकत्र येण्याची शक्यता

जेडीएस-काँग्रेसनंतर आता हे 2 पक्ष येणार एकत्र

Updated: May 22, 2018, 03:18 PM IST
काँग्रेस-जेडीएस नंतर आता हे 2 पक्ष देखील एकत्र येण्याची शक्यता title=

मुंबई : कर्नाटकमध्ये बुधवारी काँग्रेस-जेडीएसचं सरकार बनणार आहे. जेडीएस नेता एचडी कुमारस्वामी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी याला तिसरी आघाडीचे नेते एकत्रित येणार आहेत. शपथ ग्रहणाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, केरळचे मुख्य़मंत्री पिनराई विजयन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. सोबतच सीपीएम महासचिव सीताराम येचुरी, सीपीआई महासचिव सुधाकर रेड्डी, डी. राजा, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्याशिवाय नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेते फारूक अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला देखील सहभागी होणार आहेत.

पण सर्वाचं लक्ष असणार आहे ते बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर. गोरखपूर आणि फूलपूर पोटनिवडणुकीत दोघेही एकत्र आल्यानंतर आता अखिलेश यादव आणि मायावती एकाच मंचावर दिसणार आहेत. गोरखपूर-फूलपूरमध्ये भाजपला रोखण्यासाठी दोघेही पक्ष एकत्र आले आहेत. अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी मायावती यांचं कौतूक देखील केलं होतं. मायावती यांनी देखील सपा आणि बसपा 2019 च्या निवडणुकीत एकत्र निवडणूक लढवू शकतील असं म्हटलं होतं. त्यामुळे आता कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस एकत्र आल्यानंतर यूपीमध्ये सपा-बसपा देखील एकत्र येण्याची चिन्ह आहेत.