नवी दिल्ली : जेडीएस आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एच डी कुमारस्वामी यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. कुमारस्वामी यांनी दोघांना शपथविधीचं सोहळ्याचं निमंत्रण दिलं. तसंच या भेटीत कुमारस्वामी कॅबिनेट मंत्रिपदाच्या वाटाघाटीवरही चर्चा केल्याचं समजतंय.
Most of the leaders, other than BJP leaders, will attend oath taking ceremony tomorrow. Rahul Ji, Ghulam Nabi Aazad, Maywati Ji, Mamata Banerjee, Akhilesh Yadav, Chandrababu Naidu, Stalin, several people are coming: #Karnataka Chief Minister designate HD Kumaraswamy pic.twitter.com/AAu8YdVi2O
— ANI (@ANI) May 22, 2018
कुमारस्वामींचा गुरूवारी मुख्मंत्रिपदाचा शपथविधी आहे. काँग्रेसनं कुमारस्वामींना मुख्यमंत्री पद देऊ केले आहे. मात्र काँग्रेसनं २० कॅबिनेट मंत्रिपदांवर दावा सांगितला असून जेडीएसला १३ मंत्रिपदं देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. कुमारस्वामींना भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्याही मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलंय.
तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री ममता बॅनर्जी, बसप नेत्या मायावती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू आदींनाही कुमारस्वामी यांनी निमंत्रण दिलेय.
I had a warm and cordial meeting this evening, in Delhi, with Shri H D Kumaraswamy ji. We discussed the political situation in Karnataka and other matters of mutual interest. I will be attending his swearing in as CM of Karnataka, on Wednesday, in Bengaluru. pic.twitter.com/sZAwX8mQut
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2018