Sovereign Gold Bond: सर्वात स्वस्त सोनं खरेदी करण्याची ही शेवटची संधी, काय आहे सरकारी योजना?

तुम्हाला जर स्वस्तात सोने घ्यायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याची असेल तर ही संधी सोडू नका. 

Updated: Jul 10, 2021, 09:05 PM IST
Sovereign Gold Bond: सर्वात स्वस्त सोनं खरेदी करण्याची ही शेवटची संधी, काय आहे सरकारी योजना? title=

मुंबई: सोन्यामध्ये गुंतवणूक करणं कोणाल आवडणार नाही. आजचे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वात स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी खास सरकार देत आहे. तुम्हाला जर स्वस्तात सोने घ्यायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याची असेल तर ही संधी सोडू नका. सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम 2021-22 (Sovereign Gold Bond) चौथी सीरीज सोमवार 12 जुलैपासून सुरू होत आहे. ही विक्री 16 जुलैपर्यंत 5 दिवस चालणार आहे. या योजनेचा काय फायदा आहे जाणून घेऊया.

रिझर्व्ह बँकेने (RBI)ने जारी केलेल्या माहितीनुसार, Sovereign Gold Bond 2021-22 चौथ्या सीरिजला सोमवार 12 जुलैपासून सुरुवात होत आहे. या सीरिजमध्ये सोन्याची प्रति ग्रॅम किंमत 4,807 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने RBI च्या मदतीनं ही किंमत ठरवण्यात आली आहे.  मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे बॉण्ड सर्व बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCI) पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, एनएसई आणि बीएसई मार्फत विकले जाणार आहेत. तर छोट्या फायनान्स आणि पेमेंट बँकांना मात्र याची विक्री करण्याची परवानगी नसल्याची माहिती मिळाली आहे. 

Sovereign Gold Bond हा सरकारी बाण्ड आहे जो डिमॅट स्वरूपात रूपांतरित होऊ शकतो. त्याचे मूल्य रुपये किंवा डॉलरमध्ये नाही तर सोन्याच्या वजनावर होतं. उदाहरणार्थ, बॉण्ड पाच ग्रॅम सोन्याचा असेल तर पाच ग्रॅम सोन्याची किंमत जेवढी असेल तेवढी किंमत या बॉण्डची असणार आहे. हा बॉण्ड आरबीआय आणि सरकारने जारी केला आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये सरकारकडून सोव्हिएन गोल्ड बॉण्ड योजना सुरू केली. आता या योजनेतील चौथी सीरिज सुरू होणार आहे. 

Sovereign Gold Bond 2021-22 ची चौथी सीरिज सोमवारपासून म्हणजे 16 जुलै पर्यंत पाच सब्सक्रिप्शनसाठी असणार आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार तुम्ही बॉण्डसाठी ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. म्हणजेच अशा गुंतवणूकदारांसाठी एका ग्रॅम सोन्याच्या बॉण्डची किंमत 4,757 रुपये असेल. या योजनेंतर्गत एखादी व्यक्ती आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो ग्रॅम सोन्याचं बॉण्ड खरेदी करू शकणार आहे. त्याच वेळी, एक ग्रॅम किमान गुंतवणूक असणे 

आवश्यक आहे. जर एखादी ट्रस्ट किंवा संस्था असेल तर ती 20 किलो ग्रॅमपर्यंत बॉण्ड खरेदी करू शकते. बॉण्डची किंमत इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन लि. 999 शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी क्लोजिंग प्राइसवर आधारित करण्यात आली आहे.

या बॉण्डचं मोठं वैशिष्ट्यं म्हणजे त्यात शुद्धतेची कोणतीही अडचण नाही आणि 24-कॅरेट गोल्डच्या आधारे किंमती निश्चित केल्या जातात. यात सहजपणे बाहेर पडायचे पर्याय आहेत. तसेच सोन्याच्या बॉण्डवरून कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. याचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा आहे. तसेच, 5 वर्षांनंतर विक्री करण्याचा एक पर्याय आहे. 

या बॉण्डच्या मॅच्युरिटीवर बॉण्ड टॅक्स फ्री आहे. त्याशिवाय केंद्र सरकारचाही या बॉण्डच्या योजनेला पाठिंबा आहे. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यताही कमी आहे. सोन्याचे दागिने घेण्यापेक्षा गोल्ड बॉण्डचा पर्याय केव्हाही उत्तम त्यातून मिळणारा नफा अधिक आहे.