सोनिया गांधी यांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व?

काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi) पत्र लिहून खळबळ उडवून देणाऱ्या २३ नेत्यांसोबतच्या बैठकीत खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्ष देणार ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची स्पष्ट केले आहे. 

Updated: Dec 19, 2020, 05:26 PM IST
सोनिया गांधी यांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व?  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi) पत्र लिहून खळबळ उडवून देणाऱ्या २३ नेत्यांसोबतच्या बैठकीत खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्ष देणार ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची स्पष्ट केले आहे. त्यामुळे राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Congress leadership) राहुल गांधी यांना अध्यक्ष करा अशी मागणी त्यांच्या गटाने केली. तर काँग्रेस अध्यक्ष निवडणूक घेऊन निवडावा अशी मागणी काही नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काँग्रेसमध्ये लेटर बॉम्बने खळबळ उडवून देणाऱ्या २३ नेत्यांशी  पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी चर्चा केली. या बैठकीत वर्किंग कमिटीची निवडणूक घेण्याची मागणी माजी अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी केली. तर तर राहुल गांधी यांनाच अध्यक्ष करावे, अशी मागणी राहुल गांधी गटाने केली. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू असं यावेळी राहुल गांधींनी स्पष्ट केले.

सोनिया गांधी यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. यापुढेही अशाच बैठका सुरू राहतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. या बैठकीला राज्यसभा विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार मनिष तिवारी, विवेक तंखा, शशी थरूर, कमलनाथ, पी. चिदंबरम हे नेते या बैठकीला उपस्थित होते. सोनिया गांधी यांचे विश्वासू ए. के. अँटनी, अंबिका सोनी, अशोक गेहलोत, हरिष रावत हे नेतेही या बैठकीत होते.