Video: रस्त्याच्या मधोमध उभं राहून पोलीस कर्मचाऱ्यानं गायलं गाणं, बोल ऐकून तुम्हीही म्हणाल; क्या बात है!

Chandigarh cop sings song of Daler Mehndi: सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. पण या माध्यमाचा योग्य वापर केल्यास जनजागृती होऊ शकते. पोलीसही या माध्यमाचा वापर करतात. मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून नियमांबाबत जनजागृती करताना विविध राज्यांतील पोलीस दिसतात. असं असताना व्हिडीओच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती होते.

Updated: Oct 26, 2022, 03:13 PM IST
Video: रस्त्याच्या मधोमध उभं राहून पोलीस कर्मचाऱ्यानं गायलं गाणं, बोल ऐकून तुम्हीही म्हणाल; क्या बात है! title=

Chandigarh cop sings song of Daler Mehndi: सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. पण या माध्यमाचा योग्य वापर केल्यास जनजागृती होऊ शकते. पोलीसही या माध्यमाचा वापर करतात. मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून नियमांबाबत जनजागृती करताना विविध राज्यांतील पोलीस दिसतात. असं असताना व्हिडीओच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती होते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चंदीगडमधील एक वाहतूक पोलीस वेगळ्याच स्टाइलसाठी ओळखला जातो. त्याची स्टाइल पाहण्यासाठी अनेक प्रवासी थांबतात. भूपिंदर सिंग यांनी दलेर मेहंदीचे लोकप्रिय गाणे 'बोलो तारा रा रा' गाण्यातून वाहतूक नियमांचे धडे दिले. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

भूपिंदर सिंग यांनी गायलेल्या गाण्याचे बोल चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी आहेत.पोलीस दलेर मेहंदीचे गाणे का गात आहे? असा प्रश्न तेथून जाणाऱ्यांना पडत आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

2019 मध्येही भूपिंदर सिंग यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हा त्यांचा व्हिडीओ गायक दलेर मेहंदी यांनी शेअर केला होता. "मला आनंद आहे की, वाहतूक पोलीस माझ्या गाण्याचा चांगल्या कामासाठी वापर करत आहे.", अशी पोस्ट दलेर मेहंदी यांनी लिहिली होती.