एअर इंडियांची मोठी घोषणा, असा केला जवानांचा सन्मान

स्वातंत्र्य दिवसापासून सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडिया सैनिकांच्या सम्मानात त्यांच्यासाठी सर्वात आधी बोर्डिंग निश्चित केली आहे.

Updated: Aug 16, 2017, 10:45 AM IST
एअर इंडियांची मोठी घोषणा, असा केला जवानांचा सन्मान title=

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिवसापासून सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडिया सैनिकांच्या सम्मानात त्यांच्यासाठी सर्वात आधी बोर्डिंग निश्चित केली आहे. एअर इंडियाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी म्हटलं की, बोर्डिंग गेटवर अनाउंसमेंट करुन जवानांना आधी विमानात जाण्यासाठी आमंत्रित केलं जाईल. त्यांना फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लास प्रवाशांच्या आधी बोर्डिंग करण्याच्या आग्रह केला जाईल.

एअर इंडियाचा हा निर्णय आर्मी, एअर फोर्स आणि नेव्हीच्या सैनिकांसाठी लागू असणार आहे. एअरलाईन्स जवानांच्या देशांतर्गत तिकीटातही घट करु शकते. एअर इंडियाने ७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जवानांना एक तिकीटवर एक फ्री अशी ऑफर देखील दिली होती.