Shraddha Walkar Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावरुन (Shraddha Walkar Case) देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. श्रद्धासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या आफताब पूनावालाने तिची निघृणपणे हत्या केली. हत्येच्या नऊ महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलघडा झालाय. आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याने ही घटना रागाच्या भरात, काही क्षणात घडली असल्याचे कोर्टापुढे सांगितले आहे. लोकांमध्ये या घटनेविरोधात रोष असताना सोशल मीडियावर लोक मात्र अत्यंत निर्दयीपणे वागत आहेत. सोशल मीडियावर श्रद्धा वालकर प्रकरणावर बनवण्यात आलेले एक रील (reel) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबाबत अनेक खुलासे होत असताना आरुष नावाच्या व्यक्तीने या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ बनवला आहे ज्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. एवढ्या संवेदनशील विषयावर रील बनवल्याबद्दल लोकांनी त्यांना खूप फटकारले. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोक चांगलेच संतापले आहेत. लोकांनीही रीलवर कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केली.
या व्हिडिओमध्ये आरुषने स्वतः श्रद्धा आणि आफताबची भूमिका साकारली आहे. व्हिडिओच्या मागे ओम शांती ओमचे 'दास्तान-ए-ओम शांती ओम' हे गाणेही वापरले गेले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सनी प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशा संवेदनशील विषयावर कोणतीही माहिती न घेता अशी रील बनवणे चुकीचे असल्याचे लोकांनी म्हटले आहे.
Shraddha murder case is now influencer reel topic.
Trigger warning: Violence, murder, abuse. pic.twitter.com/SlUiPgDQQb
— Nirwa Mehta (@nirwamehta) November 18, 2022
व्हिडिओच्या शेवटी आरुषने, "ज्यावेळी तुम्ही हा व्हिडीओ पाहत असाल, त्या वेळी आणखी एखाद्या श्रद्धाचा आफताबच्या हातून बळी जात असेल असे म्हटले आहे."