Smriti Irani Daughter Wedding: राजस्थानमध्ये आणखी एक रॉयल विवाहसोहळा; 500 वर्षे जुन्या किल्लावर स्मृती इराणींची लेक बांधणार लग्नगाठ

Smriti Irani Daughter Wedding: स्मृती इराणी यांच्या लेकीचं लग्न सर्वाधिक हाय प्रोफाईल लग्न ठरणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी अनेक मोठ्या नेतेमंडळींचीही हजेरी असेल असं सांगण्यात येत आहे.  

Updated: Feb 8, 2023, 04:05 PM IST
Smriti Irani Daughter Wedding: राजस्थानमध्ये आणखी एक रॉयल विवाहसोहळा; 500 वर्षे जुन्या किल्लावर स्मृती इराणींची लेक बांधणार लग्नगाठ  title=
Smriti Irani Daughter to get married soon in 500 old fort in a royal wedding

Smriti Irani Daughter Wedding: (Marriage) लग्न पहावं करुन... असं म्हटलं जातं. हीच ओळ आता काहीजणांनी गांभीर्यानं घेत आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच कलाकारांचाही या यादीत समावेश. नुकतंच अभिनेत्री (Kiara Advani) कियारा अडवाणी आणि अभिनेता (Sidharth Malhotra) सिद्धार्थ मल्होत्रा यांनीसुद्धा त्यांच्या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव दिलं. राजस्थानमधील जैसलमेर (Jaisalmer) येथे असणाऱ्या (Suryagadh palace) सूर्यगढ पॅलेस येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आता याच राजेशाही थाटासाठी ओळखल्या जाणाऱ्या (Rajasthan) राजस्थानमध्ये आणखी एक बहुचर्चित विवाहसोहळा पार पडणार आहे. 

हे हाय प्रोफाईल लग्न असेल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या लेकिचं. (Rajasthan) राजस्थानातील (Khimsar) खिमसरच्या 500 वर्षे जुन्या किल्ल्यामध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असून, सध्या तिथं अनेक पाहुणे जमण्यासही सुरुवात झाली आहे. इराणी यांच्या लेकिला म्हणजेच (shanelle irani) शनेलला तिचा प्रियकर अर्जुन भल्ला यानं याच किल्ल्यावर लग्नाची मागणी घातली होती. म्हणून ही जोडी याच किल्ल्यावरून त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. 

किल्ल्याचा इतिहास 500 वर्षे जुना 

साधारण 500 वर्षे जुना हा किल्ला जोधपूर (jodhpur) आणि नागोरच्या (Nagore) मध्ये उभा आहे. रासजस्थानातील इतर ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये या किल्ल्याचंही नाव घेतलं जातं. जोधपूरच्या राव करमसजी यांनी 1523 मध्ये हा किल्ला उभारला होता. तब्बल 71 खोल्या असणाऱ्या या महालवजा किल्ल्यामध्ये आजच्या युगातील सर्व सुविधा काळानुरूप बसवण्यात आल्या. इथं लक्झरी रुम्सपासून आलिशान सुईटसुद्धा उपलब्ध आहेत. राजस्थानात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा किल्ला आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. रेस्तराँ, पार्टी लॉन, रॉयल चेम्बर्स, जिम, स्विमिंग पूल अशा अनेक सुविधा इथं येणाऱ्यांसाठी सज्ज आहेत. 

खींवसर फोर्ट में हो रही शादी

.

1523 में हुआ था किले का निर्माण

500 साल पुराना है शाही किला

कोण आहे स्मृती इराणी यांचा होणारा जावई? 

शनेल इराणीचा होणारा पती आणि स्मृती इराणी यांचा होणारा जावई, एक कॅनडास्थित वकील आहे. वकिलीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अर्जुननं अनेक क्षेत्रांत यश मिळवलं आहे. 2014 मध्ये त्यानं ब्रेकवाटर सोल्यूशन्स इंकसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे त्याच्या यशात भर पडत गेली. सूत्रांच्या माहितीनुसार तो 4 लाख डॉलर्स इतक्या संपत्तीचा मालक आहे. शनेल ही जुबिन इराणी यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. तर, स्मृती आणि जुबिन यांना जोर आणि जोईश अशी दोन मुलं आहेत. सध्या हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या घरातील लगीनघाईमध्येत व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे.