OMG! एकाच स्कूटीवर बसण्यासाठी 6 जणांचा अजब जुगाड, थरारक स्टंटचा पाहा व्हिडीओ

त्यांनी स्कूटीची केली 'गोलमाल बाईक', वाहतुकीचे नियम वाऱ्यावर, पाहा व्हिडीओ 

Updated: May 24, 2022, 08:38 AM IST
OMG! एकाच स्कूटीवर बसण्यासाठी 6 जणांचा अजब जुगाड, थरारक स्टंटचा पाहा व्हिडीओ   title=

मुंबई : भारतात 5 लाखहून अधिक रस्ते दुर्घटना होत असतात. त्यामध्ये जास्त दुर्घटना या नियम न पाळल्याने किंवा स्टंटबाजी करताना झाल्याच्या समोर आल्या आहेत. तर काही दुर्घटना किंवा अपघात हे नियंत्रण सुटल्याने झाले आहेत. 

बाईकस्वार नियम पाळत नसल्याने किंवा नियम हलक्यात घेत असल्याचं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा जीव धोक्यात घालून बाईकस्वार स्टंट करत असल्याचं दिसून आलं आहे. एकाच बाईकवर एक दोन नाही तर चक्क 6 लोक बसले आहेत. 

5 लोक बाईक सीटवर बसले आणि त्यांच्या खांद्यावर एक तरुण बसला आहे. हे सगळे रस्त्यावरून जात आहेत. यापैकी एकाही तरुणाने डोक्यावर हेल्मेट घातल्याचं दिसत नाही. 

ह्या तरुणांच्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्कूटीवर 6 लोक बसले आहेत. याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा स्टंट पाहून रस्त्यावरून जाणारे लोकही हैराण झाले आहेत. हे ट्वीट मुंबई पोलीस आणि पोलीस कमिश्नला टॅग केलं आहे.

हा व्हिडीओ 55 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ह्या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी तर यांना बेजबाबदार आणि बेफिकीर म्हटलं आहे. जीवघेणा स्टंट तुम्ही करू नका त्यामुळे जीवाला धोका असतो असंही सांगण्यात आलं आहे. 

एक युजर म्हणतो की लोक नियम, कायदे आणि पोलिसांना घाबरत नाही ते यावरून स्पष्ट होतं. हे खूप चुकीचं असल्याचं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. या स्कूटीची नंबर प्लेट दिसत असून पोलिसांनी यांच्यावर कारवाई करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करावा अशी मागणी होत आहे.