नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८८,६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ११२१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९, ९२,५३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,५६,४०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशातील ४९,४१,६२८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील ९४,५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवणं आवश्यक, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
साधारण आठवडाभरापूर्वी भारतात प्रत्येक दिवशी ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर बिकट आव्हान निर्माण झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत हा आकडा ९० हजाराखाली आला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जवळपास तितकेच आहे.
7,12,57,836 samples tested up to 26th September for #COVID19. Of these, 9,87,861 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/xgodnDvPpb
— ANI (@ANI) September 27, 2020
सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या २०,४१९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४३० जणांचा मृत्यू झाला. परंतु, महाराष्ट्रातील कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्येही वाढ झाली आहे. काल राज्यभरात कोरोनावर मात केलेले २३,६४४ जण रुग्णालयातून घरी परतले. त्यामुळे महाराष्ट्रात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही १०,१६,४५० इतकी झाली आहे.