मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ५३ हजार ६०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ वर पोहचली आहे. भारत आता कोरोना मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे
Now, India has 28.21% active cases, 69.80% cured/discharged/migrated and 1.99% deaths: Government of India. https://t.co/anIefKqDIG
— ANI (@ANI) August 11, 2020
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ इतकी झाली आहे. त्यापैकी ६ लाख ३९ हजार ९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १५ लाख ८३ हजार ४९० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४५ हजार ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्याप्रमाणे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार देशात ऍक्टीव्ह कोरोना २८.२१ टक्के आहे. तर या धोकादायक विषाणूच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६९.८० टक्के असून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे.