Shradhha Murder Case : आफताबच्या क्रुरतेचा आणखी एक पुरावा, फोटोनंतर श्रद्धाचं Whats App चॅट समोर

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक खुलासा, पोलिसांच्या हाती लागला आफताबच्या क्रुरतेचा आणखी एक पुरावा

Updated: Nov 18, 2022, 05:13 PM IST
Shradhha Murder Case : आफताबच्या क्रुरतेचा आणखी एक पुरावा, फोटोनंतर श्रद्धाचं Whats App चॅट समोर title=

Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरणात (Shraddha Walkar Murder Case) दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता आफताब पुनावाल्याच्या (Aaftab Poonawala) क्रुरतेचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. श्रद्धा आणि आफताबच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यांच्यात काही ना काही कारणाने भांडणं होत होती. आफताब श्रद्धाला मारहाण करत होता, याचा पुरावा म्हणजे श्रद्धाचा एक फोटो समोर आल आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा दिसत आहेत. त्यानंतर आता श्रद्धाचा एक व्हॉट्सअॅप चॅट (Whats App Chat) पोलिसांच्या हाती लागला आहे. 

काय आहे त्या व्हॉट्सअॅच चॅटमध्ये
पोलिसांच्या हाती जो व्हॉट्सअॅप चॅट लागला आहे त्यात श्रद्धाने आपल्या कंपनीतल्या टीम लीडर करण भक्की यांच्याशी केलेल्या संभाषणाचं तो चॅट आहे. हे संभाषण 24 नोव्हेंबर 2020 मधलं आहे. यात तीने आपली तब्येत ठिक नसल्याचं सांगत आहे. त्याच दिवशी आफताबने श्रद्धाला जबर मारहाण केली होती.

श्रद्धाने आपल्या चॅटमध्ये लिहिलंय, मी आज कामावर येऊ शकत नाही, काल त्याने (आफताब) मारल्याने कदाचित माझा बीपी लो झाला आहे. आणि अंगही खूप दुखतंय. बेडवरुन उठायची माझ्यात ताकद नाहीए. पुढे श्रद्धा म्हणते, माझ्यामुळे जो त्रास होतोय आणि कामाचं नुकसान होतंय, त्यासाठी मी माफी मागते.

23 नोव्हेंबरला जखमी झाल्याचा फोटो
याआधी श्रद्धाचा आणखी एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आला होता. श्रद्धा आणि तिच्या एका मैत्रिणीदरम्यानचं हे संभाषण  23 नोव्हेंबर 2020 चं आहे. आफताबने तिला जबर मारहाण केली होती. मैत्रिणीने श्रद्धाच्या तब्येतीची विचारपूस केली होती, तसंच ती आफताबरोबर सुरक्षित आहे का असंही विचारलं होतं. याला उत्तर देताना श्रद्धाने आपल्याला मारहाण झालेला फोटो व्हॉट्सअॅप आपल्या मैत्रिणीला पाठवला होता. 

तीन दिवस श्रद्धा होती रुग्णालयात
आफताबने श्रद्धाला मारहाण केल्यानंतर ती तीन दिवस रुग्णालयात दाखल होती असा आरोप तिच्या मैत्रिणीने केला आहे. श्रद्धाचा नविन फोटो मीडियासमोर आला आहे, त्यात श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमेच्या खूणा दिसत आहेत. मित्र-मैत्रिणींनी समजूत घातल्यानंतरही श्रद्धा आफताबचा त्रास का सहन करत होती, हा एक प्रश्चन आहे.

रेंट अॅग्रीमेंटवर पती-पत्नी असा उल्लेख
पोलिसांच्या तपासात श्रद्धा आणि आफताबने मुंबईत एक फ्लॅट भाड्याने घेतला होता.  रेंट अॅग्रीमेंटवर त्यांनी पती-पत्नी असा उल्लेख केला होता. फ्लॅटची मालकीण जयश्री पाटकर हिने ही माहिती दिली आहे. या दोघांमध्ये प्रचंड भांडण होत असल्याचंही जयश्री यांनी सांगितलं आहे. इमारतीच्या खालीही हे दोघं भांडण करत असतं, इमारतीतल्या अनेकांना याची सवय झाली होती.