LIC पॉलिसीवरही घेऊ शकता कर्ज, जाणून घ्या नियम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

LIC Policy Loan Facility: विमा काढताना आपल्या मनात सहज विचार येतो की, मृत्यूनंतरच नाही तर, जिवंत असतानाही फायदा मिळाला पाहीजे. अशा काही फायदेशील पॉलिसी एलआयसीमध्ये आहेत. एलआयसीच्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला सर्व्हायव्हल बेनिफिट देखील मिळतो. दुसरीकडे एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) अनेक फायदे आहेत. 

Updated: Dec 22, 2022, 02:35 PM IST
LIC पॉलिसीवरही घेऊ शकता कर्ज, जाणून घ्या नियम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया title=

LIC Policy Loan Facility: विमा काढताना आपल्या मनात सहज विचार येतो की, मृत्यूनंतरच नाही तर, जिवंत असतानाही फायदा मिळाला पाहीजे. अशा काही फायदेशील पॉलिसी एलआयसीमध्ये आहेत. एलआयसीच्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला सर्व्हायव्हल बेनिफिट देखील मिळतो. दुसरीकडे एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) अनेक फायदे आहेत. पॉलिसीच्या माध्यमातून कर्ज देखील घेता येते. तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र ही बातमी खरी आहे. विमा पॉलिसीवर मिळणाऱ्या कर्जाचं व्याज (LIC Policy Loan) पर्सनल लोनवर घेतल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा कमी असतं. चला जाणून घेऊयात एलआयसी पॉलिसीवर लोन कसं घेता येईल. 

एलआयसी पॉलिसीवर कर्जासाठी अर्ज कसा करावा?

तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असेल तर तुम्ही कर्जासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एलआयसी कार्यालयात जावे लागेल. तसेच केवायसी कागदपत्रे सोबत घ्यावी लागतील. दुसरीकडे, ऑनलाइन अर्जासाठी तुम्हाला एलआयसी ई-सेवेवर (LIC E-Service) नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर लॉगिन करा आणि पॉलिसीवर कर्जासाठी पात्र आहात की नाही ते तपासा. पॉलिसीसाठी पात्र असल्यास, कर्जाच्या अटी, शर्ती आणि व्याजदर नीट वाचा. यानंतर अर्ज सबमिट करा आणि KYC कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुमचे अर्जाचे काम पूर्ण होईल.

बातमी वाचा- Loan Against Property बाबत जाणून घ्या, अडचणीच्या काळात होईल मदत

LIC पॉलिसीवर कर्ज घेण्याची नियमावली

  • ट्रेडिशनल आणि एंडोमेंट पॉलिसींसारख्या निवडक पॉलिसींवरच कर्ज मिळतं.
  • सरेंडर मूल्यानुसार कर्जाची रक्कम ठरवली जाते. पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या 80-90% पर्यंत कर्ज मिळते.
  • कर्जाचा व्याजदर पॉलिसीधारकाच्या प्रोफाइलवर अवलंबून असतो, सामान्यतः तो 10-12 टक्के असतो.
  • पॉलिसीवर कर्ज देताना कंपनी तुमची पॉलिसी गहाण ठेवते.
  • तुम्ही कर्जाची रक्कम परत न केल्यास कंपनीला पॉलिसी बंद करण्याचा अधिकार आहे.
  • कर्जाची परतफेड करण्यापूर्वी पॉलिसी परिपक्व झाल्यास, कर्जाची रक्कम तुमच्या रकमेतून वजा केली जाते.