दुकानदार ते दिग्गज स्टॉक मार्केट गुंतवणूकदार; फक्त 19 वर्षात या व्यक्तीने उभी केली 3 लाख कोटींची कंपनी

 स्टॉक ब्रोकर, ट्रेडर आणि डी - मार्ट कंपनीचे फाउंडर म्हणून दमानी यांची ओळख आहे.

Updated: Nov 8, 2021, 03:50 PM IST
दुकानदार ते दिग्गज स्टॉक मार्केट गुंतवणूकदार; फक्त 19 वर्षात या व्यक्तीने उभी केली 3 लाख कोटींची कंपनी title=

मुंबई  : रिटेल चैन कंपनी डी-मार्ट (D-MART)ने भारतात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटलाइजेशन 3 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. डी-मार्ट कंपनी एवेन्यु सुपरमार्केट लिमिटेड अंतर्गत येते. कमी वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणाऱ्यांमध्ये डी मार्टचे नाव 17 व्या स्थानावर नोंदवले गेले आहे. या वर्षी डी मार्टच्या शेअर्समध्ये 70 टक्क्यांपर्यंतची तेजी दिसून आली आहे. 

या मार्केट कॅपिटलायजेशनच्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टंसी, एचडीएफसी बँक, इंफोसिस, हिंदुस्तान युनिलीवर, एचडीएफसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओएनजीसी, विप्रो लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि एशियन पेंट्स या शेअर्सची नावे येतात. डीमार्टचा महसुल एका वर्षात 46 टक्क्यांनी वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये या कंपनीला 7 हजार 600 कोटीहून अधिक महसूल मिळाला आहे. 

राधाकिशन दमानी यांच्याविषयी (Radhakishan Damani)
डी-मार्ट कंपनीचे मालक राधाकिशन दमानी आहेत. ज्यांचे नाव भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये येते. दमानी स्टॉक मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार आहेत. स्टॉक ब्रोकर, ट्रेडर आणि डी - मार्ट कंपनीचे फाउंडर म्हणून दमानी यांची ओळख आहे. दमानी यांनी सामान्य स्टॉक ब्रोकरपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे.

वर्ष 1954 साली राधाकिशन दमानी यांचा जन्म मुंबईच्या एका मारवाडी कुटूंबात झाला होता. त्यांचे वडिल शिव किशन दमानी  हे त्या वेळचे स्टॉक ब्रोकर होते. राधाकिशन दमानी यांनी मुंबई विद्यापिठात बी कॉमचे शिक्षण घेतले. एका वर्षाच्या शिक्षणानंतर त्यांनी कॉलेज सोडले. आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

कशी सुरू केली कंपनी
राधाकिशन दमानी यांनी आपल्या व्यवसायाची सुरूवात बॉल - बेअरिंगपासून केली. वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये ब्रोकर म्हणून काम सुरू केले. दमानी यांचा व्यवसाय विशेष चालत नव्हता. वडीलांच्या मृत्यूनंतर नाइलाजाने त्यांना ब्रोकरचा व्यवसाय करावा लागला. 

त्यांचे मोठे भाऊ स्टॉक मार्केटमध्ये काम करीत होते. यामुळे या व्यवसायात त्यांना अडचण आली नाही. परंतु काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न असलेल्या राधाकिशन यांनी ब्रोकर व्यवसायाच्या पुढे जाण्याचे ठरवले. त्यांनी वयाच्या 32 व्या वर्षी स्टॉक मार्केट गुंतवणूकदार म्हणून थेट मार्केटमध्ये पाऊल ठेवले. आणि मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली.

2002 मध्ये सुरू झाले डीमार्ट
सुरूवातीला त्यांना नुकसान झाले परंतु त्यानंतर त्यांनी देशातील चांगल्या गुंतवणूकदारांमध्ये आपले नाव कमावले. दमानी यांनी कमाईसाठी शॉर्ट सेलिंग रणनितीच्या माध्यमातून नफा कमावला. एक वेळ अशीही आली ज्यावेळी त्यांना मार्केटमध्ये मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यावेळी त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याची योजना आखली. 

आधीपासून त्यांनी रिटेल व्यवसायाची आवड होती. दमानी यांना अमेरिकी कंपनी वॉलमार्ट रिटेल चैनची आवड होती. त्याच धर्तीवर त्यांनी 2002 मध्ये डीमार्टची स्थापना केली.

संपूर्ण देशात 220 पेक्षाही अधिक स्टोअर
सुरूवातीला एक स्टोअर सुरू करून त्यांनी या व्यवसायाची सुरूवात केली. कारण त्यावेळी भांडवल कमी होते. डीमार्टचे पहिले स्टोअर मुंबईच्या पवई येथे सुरू झाले. आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने त्यांच्या स्टोअरची संख्या वाढत नेली. डीमार्टचा व्यवसाय इतका वाढत गेला की, आज देशभरात कंपनीचे 220 लार्ज फॉरमॅट स्टोअर आहेत. या व्यवसायामुळे आज राधाकिशन दमानी यांची भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गणना होते.

Shopkeepers to stock market investors In just 19 years this man has built a Rs 3 lakh crore company dmart the success story of Radhakishan Damani