एक डुलकी मृत्यूची! तोल बिघडला अन् सेकंदात सगळं संपलं; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

Accident Viral Video: एक व्यक्ती केबिनमध्ये बसून बसमध्ये प्रवास करत होती. त्यावेळी बसचा दरवाजा उघडा होता. केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तीला झोप लागली. तेव्हा डुलकी घेताना त्या व्यक्तीचा तोल बिघडला  अन्...

Updated: Jul 16, 2023, 07:35 PM IST
एक डुलकी मृत्यूची! तोल बिघडला अन् सेकंदात सगळं संपलं; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO   title=
Shocking Video of Man sleeping in cabin seat falls from moving bus watch dangerous accident video

Man fell from bus Shocking Video: भारतात मोठ्या प्रमाणात रोड अपघाताचं (Road Accident) प्रमाण वाढलं आहे. भारत सरकारच्या रिपोर्टनुसार, 2021 या वर्षात देशात एकूण 4,12,432 रस्ते अपघातांची नोंद झाली. अनेक रस्ते अपघात हे रात्रीच्या वेळेत झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या अहवालातून समोर आली होती. अशातच आता एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

झोप झाल्याशिवाय प्रवास करू नये, असं म्हणतात. प्रवासात गाडी चालवताना एक डुलकी जीवघेणी ठरू शकते. मात्र, प्रवास करताना देखील डुलकी घेणं किती धोकादायक ठरू शकतं, याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. झोपेत असलेल्या या व्यक्तीने थेट यमलोकाला गवसणी घातली. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Shocking Video of Man sleeping in cabin seat falls from moving bus watch dangerous accident video)

आणखी वाचा - Sonia Gandhi Dance: भातलावणी करणाऱ्या शेतकरी महिलांसोबत सोनिया गांधींनी धरला ठेका; पाहा Video

एक व्यक्ती केबिनमध्ये बसून बसमध्ये प्रवास करत होती. त्यावेळी बसचा दरवाजा उघडा होता. केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तीला झोप लागली. तेव्हा डुलकी घेताना त्या व्यक्तीचा तोल बिघडला आणि तो व्यक्ती थेट चालत्या बसमधून दरवाजातून खाली पडला. त्यावेळी शेजारी बसलेल्या व्यक्तीला नेमकं काय पडलं कळलं नाही. त्याला काय करावं सुचेना. त्यावेळी ड्राईव्हरने बस थांबवली. त्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता अशी माहिती समोर आली आहे.

पाहा Video

दरम्यान, अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ @devkaranshabhadiya इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांनी बस ड्राईव्हरला जबाबदार धरलं असून निष्काळजीपणा असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.