किंग कोबराला केलं किस, पाहा पुढे काय झालं... श्वास रोखून धरणारा Video

Snake Man of Kerala या नावाने तो प्रसिद्ध आहे, Video होतोय व्हायरल

Updated: Oct 23, 2022, 06:28 PM IST
किंग कोबराला केलं किस, पाहा पुढे काय झालं... श्वास रोखून धरणारा Video title=

Social Media Trending: सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडिओ (Video) पाहून काही क्षणासाठी तुमचाही श्वास रोखला जाईल. अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या किंग कोबराच्या (King Cobra) नावानेच घाम फुटतो. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका व्यक्तीने किंग कोबराला चक्क किस केल्याचं पाहिला मिळतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

धक्कादायक व्हिडिओ 
या व्हिडिओत एक व्यक्ती फणा काढलेल्या किंग कोबराच्या मागे बसलेला दिसतोय. अगदी सावधपणे कोणतीही हालचाल होऊ न देता तो व्यक्ती किंग कोबराच्या फण्याचा चूंबन घेताना दिसत आहे. या व्यक्तीचं नाव  वावा सुरेश (Suresh) असं असून तो स्नेक मॅन ऑफ केरळ (Snake Man of Kerala) या नावाने ओळखला जातो. अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वावा सुरेश अगदी अलगदपणे (Patience) किंग कोब्राच्या जवळ येतो आणि त्याचे चुंबन घेताना दिसत आहे. अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या किंग कोबरबरोबर त्याने केलेलं धाडस खरंच धोकादायक ठरू शकत होतं. सुदैवाने कोब्राने हल्ला (Attack) केला नाही, अन्यथा असं करणं त्याच्या जीवावरही बेतू शकत होतं.

वावा सुरेश हा सर्पमित्र (Snake Rescuer) म्हणून ओळखला जातो. वावा सुरेश याने आतापर्यंत तब्बल 38 हजार साप पकडले आहेत. यापैकी 190 किंग कोबरा प्रजातीचे आहेत. साप पकडून त्यांना जंगलात सोडण्याचं काम वावा सुरेश करतो. पण असं धाडसं करण त्याच्या नक्कीच जीवावर बेतू शकलं असतं.