नवी दिल्ली : सिरसा मुख्यालयातील डेरा सच्चा सौदाच्या डेऱ्यात सध्या शोधकार्य सुरु आहे. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. राम रहिम सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. पण त्याने जमवलेली माया आणि त्याचे कृत्य आता जगासमोर येण्यास सुरुवात झाली आहे. डेऱ्यातील छापेमारीत बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचं देखील आता समोर येतं आहे. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
सर्च ऑपरेशन दरम्यान, असे उघड झाले आहे की, हॉस्पिटलच्या नावाने गुरमीत हा मानवी अवयवांची विक्री करुन काळा व्यवसाय कमवत होता. एवढेच नाही तर, डेऱ्यामध्ये त्वचा प्रत्यारोपण देखील होत होतं. अवैधपणे स्कीन ट्रान्सप्लंट होत असल्याचं समोर येत आहे. बाबा हा सेक्स अॅडिक्ट असल्याचं देखील समोर आलं आहे. त्यासाठी तो विविध औषधं मागवायचा. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये हे समोर आलं आहे.