धक्कादायक! महिलेला एकाचवेळी कोरोनाच्या दोन वेरिएंटचा संसर्ग; शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर

कोरोना झालेल्या एका 90 वर्षीय महिलेचा रुग्णालयात 5 व्या दिवशी मृत्यू झाला आहे. चाचण्यांमध्ये माहिती मिळाली आहे की, महिलेला अल्फा आणि बीटा दोन्हींचा संसर्ग झाला होता.  

Updated: Jul 11, 2021, 05:59 PM IST
धक्कादायक! महिलेला एकाचवेळी कोरोनाच्या दोन वेरिएंटचा संसर्ग; शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर title=

नवी दिल्ली : कोरोना झालेल्या एका 90 वर्षीय महिलेचा रुग्णालयात 5 व्या दिवशी मृत्यू झाला आहे. चाचण्यांमध्ये माहिती मिळाली आहे की, महिलेला अल्फा आणि बीटा दोन्हींचा संसर्ग झाला होता.  

कोविड 19 च्या डबल इन्फेक्शन बाबत प्रश्न विचारले जात आहेत. बेल्जियममधून एक घटना समोर आली आहे. त्यामुळे वैज्ञानिकांमध्ये संभ्रम वाढला आहे. एका 90 वर्षीय महिलेला कोविड 19 च्या दोन वेरिएंटचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर 5 दिवसांनी तिचे निधन झाले. त्या महिलेला UK येथील अल्फा आणि दक्षिण अफ्रिकेत मिळालेल्या बीटा वेरिएंटने संसर्ग झाला होता. डॉक्टरांच्या मते अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच उदाहरण असावे.

वैज्ञानिकांच्या मते, महिलेला दोन वेगवेगळ्या लोकांकडून संसर्ग झाला असावा. या घटनेनंतर कोविडचे वेगवेगळ्या वेरिएटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला लस किती बचावात्मक ठरू शकते याबाबत वैज्ञानिक अभ्यास करीत आहेत.

संसर्गाच्या माहितीनंतर महिलेचा 5 दिवसांनी मृत्यू झाला होता. त्यांनी लस घेतली नव्हती. ती महिला एकटीच राहत असे. तिला संसर्ग झाल्यानंतर ती काही दिवस घरीच उपचार घेत होती. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिची ऑक्सिजन लेवल ठिक होती. नंतर पाच दिवसांनी तिचा मृत्यू झाला. चाचण्यांमध्ये लक्षात आलं की, तिला दोन कोविडच्या वेरिएंटचा संसर्ग झाला होता.