मुंबई : मे महिन्याच्या सुट्टीला प्रत्येकजण कुठे ना कुठे फिरायला जायचा प्लान करतात. तर आताच लग्न झालेले अनेक कपल्स हनीमुनला जाण्यासाठी अनेक पर्याय शोधत असतात. अशा साऱ्यांसाठी एक मस्त जागा वाट पाहत आहे आणि ती जागा म्हणजे शिमला.
उत्तर भारतात आलेल्या वादळामुळे हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, शिमला सारख्या भागांत आता मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. हे फोटो मंगळवारचे 8 मे रोजीचे सकाळचे फोटो आहेत. आपण पाहू शकता या फोटोंच्या माध्यमातून शिमलाचा खास लूक
सतत होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे हिमाचलची राजधानी असलेल्या शिमलामध्ये अगदी रोमँटिक वातावरण झालं आहे. बर्फामुळे शिमलाची रस्त्यांवर जणू सफेद चादर पांघरली आहे. बर्फामुळे शिमलातील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसलं आहे त्यामुळे बंद ठेवण्यात आली आहेत.
शिमलाच्या माल रोडवर बर्फ कोसळल्यामुळे सर्व मार्ग ठप्प झाले आहेत. मौसम विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजच्या तापमानात 4 ते 5 डिग्रीने कमी झालं आहे. पावसामुळे तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना भरपूर आनंद झाला आहे.
बर्फवृष्टीमुळे पुन्हा एकदा शिमला पर्यटकांना गारठायला सज्ज झालं आहे. शिमलासोबत रोहतांग, लाहोल आणि किन्नोरच्या अनेक भागात हिमपात आहे. पर्वतांच्या ठिकाणी बर्फवृष्टी झाल्यामुळे तापमान कोसळलं आहे. दिल्ली - एनसीआरमध्ये थोडं उन्ह असूनही हवेत गारवा आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शिमला, सोलन, सिरमौर, मंडी, कुल्लू आणि चंबा सारख्या काही ठिकाणांवर पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.