नवी दिल्ली : पन्नीरसेल्वम आणि पलनिसीमा या दोघांनी एक ठराव मंजूर करत व्ही. के. शशिकला यांना सरचिटणीस पदावरुन हद्दपार करत पक्षातून बाहेरचा मार्ग दाखवला आहे. हा प्रस्ताव अण्णाद्रमुकच्या बैठकीत मंजूर केला गेला.
तामिळनाडूचे मंत्री आरबी उदयकुमार यांनी बैठकीत पास केलेल्या या प्रस्तावाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जयललितांनी पदाधिकारी म्हणून नियुक्त केलेले पदाधिकारी पदावर कायम राहतील. आता पार्टी अविभाजित आहे आणि फक्त सरचिटणीस पदाला रद्द करत शशिकला यांना पक्षातून काढून टाकलं आहे.
उदयकुमार यांनी म्हटलं की, जयललिता पक्षाच्या स्थायी महासचिव राहतील. संयुक्त अण्णाद्रमुकने असा युक्तिवाद केला आहे की शशिकला यांना हटविण्यात आल्यानंतर आता 26 डिसेंबर 2016 पासून घेतलेले सर्व निर्णय रद्द केले जातील. त्यापैकी शशिकला यांचा नातेवाईक टीटीव्ही दिनकरन यांचा उपमहासंचालक बनवण्याचा निर्णय देखील आहे. जो रद्द केला जाईल. म्हणजेच, दिनकरन यांची कोणतीही घोषणा पक्षाला लागू असणार नाही.
याआधी अण्णाद्रमुकचे दोन्ही गट पन्नीरसेल्वम आणि पलनिसीमी यांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. या विलिनीकरणाचा आधारच हा होता की शशिकला यांना पक्षातून बाहेर करावे. द्रमुकने विश्वास मताची मागणी करत विलिनीकरणाला विरोध केला होता. द्रमुकने दावा केला की मुख्यमंत्री पलानीस्वामीकडे पुरेसे संख्याबळ नाही. टीटीव्ही दिनकरन यांनीही ही मागणी लावून धरली होती.