Rakesh Jhunjhunwala ची Akasa Airline उंच भरारी घेण्यासाठी सज्ज; अशा विशेष सेवाही असणार

Rakesh Jhunjhunwala Airline : आकाशात उंच भरारी घेण्यासाठी राकेश झुनझुनवालाची अकासा ही एअरलाईन कंपनी सज्ज झाली आहे. लवकरच अकासाचे विमान प्रवाशांना सेवा देतील. कंपनीने असंही सांगितलं की, प्रत्येक महिन्याला दोन अतिरिक्त विमान आणि 2023 च्या अखेरपर्यंत कंपनीचे 18 विमान दाखल होतील.  

Updated: Aug 3, 2022, 11:14 AM IST
Rakesh Jhunjhunwala ची Akasa Airline उंच भरारी घेण्यासाठी सज्ज; अशा विशेष सेवाही असणार title=

मुंबई : शेअर बाजारात राकेश झूनझूनवालाचा पोर्टफोलियोमध्ये दमदार परतावा पहायला मिळतो. आता तर राकेश झुनझुनवाला विमान प्रवासी सेवा उद्योगात एक नवा अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच राकेश झुनझुनवाला यांच्या Akasa Airlines चे विमान आकाशात भरारी घेणार आहेत.

 शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळख असणारे राकेश झूनझूनवाला यांची Akasa Airlines येत्या सप्टेंबर महिन्यापासून चेन्नई ते मुंबई मार्गावर सेवा सुरु होणार आहे.

नवी विमाने

राकेश झूनझूनवाला यांची Akasa Airlines येत्या सप्टेंबर पासून नव्या मार्गांवर विमान सेवा सुरु करत आहे. 15 सप्टेंबर पासून चेन्नई ते मुंबई मार्गावर Akasa Airlinesचे विमान भरारी घेतील. 7 ऑगस्टला मुंबई ते अहमदाबाद मार्गावर पहिली व्यवसायिक सेवा सुरु करणार आहे. याशिवाय, Akasa Airlines येत्या 13 ऑगस्ट पासून बंगळुरू ते कोच्ची या मार्गावर विमान सेवा सुरु केली जाणार आहे. त्याचबरोबर, Akasa Airlines येत्या 19 ऑगस्टला बंगळुरू ते मुंबई मार्गावर सेवा सुरु करणार आहे.

प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

Akasa Airlinesच्या वतीने असं सांगण्यात आलं आहे की, Akasa Airlines दुसऱ्या Airlines च्या तुलनेत अधिक खास असणार आहे. अशा अनेक सुविधा यामध्ये असणार आहेत ज्या प्रवाशांना  नवीन असतील. असं बोललं जातंय की, या विमानांची सीटिंग अरेंजमेंट जास्त आरामदायी असणार आहे. त्यासोबतच, सर्व प्रवाशांना सीटवर यूएसबी पोर्ट देखील मिळणार आहे.

नवीन विमान मार्ग

एअरलाईनने असं सुद्धा सांगितलं आहे की, चेन्नई आणि मुंबईमध्ये नवीन दैनिक सेवा देणारी विमान येत्या 15 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर, प्रत्येक महिन्याला दोन अतिरिक्त विमान आणि 2023 च्या शेवटपर्यंत त्यांच्याकडे 18 विमान असतील. याशिवाय, एअरलाईन मार्केटमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळणार आहे. आपली कंपनी कशी सर्वात टॉपला असेल यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.