Dry Shampoo : शॅम्पूमुळे कॅन्सर! तुम्ही तर हा शॅम्पू वापरत नाही ना?

shampoo causing cancer : तुम्ही देखील ड्राय शॅम्पू वापरत असाल तर आताच सावध व्हा. कारण या शॅम्पूमुळे कॅन्सर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जागतिक FMCG दिग्गज Unilever Plc ने ड्राय शॅम्पूचे काही लोकप्रिय ब्रँड परत मागवले आहेत.   

Updated: Oct 26, 2022, 01:46 PM IST

shampoo_causing_cancer

Dry Shampoo Brands Recalled : आताची सर्वात धक्कादायक बातमी...आपण प्रत्येक जण केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करतो. पण या शम्पूमुळे कॅन्सरचा धोका असल्याचं समोर आलं आहे. आज बाजारात अनेक कंपनीचे शॅम्पू उपलब्ध आहेत. तर धावपळीच्या युगात झटपट केस धुण्यासाठी आज मार्केटमध्ये ड्राय शॅम्पू देखील सहज मिळतात. जर तुम्ही देखील ड्राय शॅम्पू वापरत असाल तर आताच सावध व्हा. कारण या शॅम्पूमुळे कॅन्सर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जागतिक FMCG दिग्गज Unilever Plc ने ड्राय शॅम्पूचे काही लोकप्रिय ब्रँड परत मागवले आहेत. 

यामुळे कॅन्सर धोका

ड्राय शॅम्पूमध्ये बेंझिन आढळून येतं. या बेंझिनमुळे आपल्या कॅन्सरचा धोका आहे, असं एफडीएनं आपल्या रिकॉल नोटिशीत म्हटलं आहे. बेंझिन तोंडावाटे, त्वचेतून शरीरात गेल्यास आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. बेंझिनमुळे आपल्याला ल्युकेमिया आणि रक्ताचा कर्करोग होण्याची भीती आहे. त्यामुळे जर तुम्ही ड्राय शॅम्पूचा वापर करत असाल तर आताचा सावध व्हा. (shampoo causing cancer and Dry Shampoo Brands Recalled nmp )

कुठल्या ब्रँडचे शॅम्पू मागवले परत?

युनिलिव्हरने Dove Dry Shampoo Volume and Fullness, Dove Dry Shampoo Fresh Coconut,  tresemme dry shampoo परत मागवले आहेत. त्याशिवाय Nexxus Dry Shampoo Refreshing Mist, Suave Professionals Dry Shampoo Refresh and Revive आणि Tiggy या ब्रँडचे ड्राय शॅम्पूंचा देखील समावेश आहे.  यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या नोटीसनुसार, ते रॉकाहोलिक आणि बेड हेड ड्राय शैम्पू आहेत.

या काळातील उत्पादने मागवली परत

अहवालानुसार, प्रामुख्याने ऑक्टोबर 2021 पूर्वी उत्पादित उत्पादने परत मागवण्यात आली आहेत. परंतु या हालचालीमुळे वैयक्तिक स्वच्छता उत्पादनांमध्ये एरोसोलच्या (Aerosol) सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या दीड वर्षात अनेक एयरोसोल सनस्क्रिन्स बाजारातून माघारी बोलवण्यात आल्या. त्यात जॉन्सन अँड जॉन्सनच्या Neutrogena, Edgewell Personal Care Co.च्या Banana Boat आणि Beiersdorf AG’s च्या Coppertone चा समावेश आहे.