शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिला कोण आहेत ? काय करतात?

 या महिला नक्की कोण आहेत ? त्या काय करतात ? त्यांनी ही योजना कधी आखली ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.

& Updated: Jan 3, 2019, 03:39 PM IST
शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिला कोण आहेत ? काय करतात? title=

केरळ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश बंदीच आहे. पण ही बंदी झुगारून बिंदू अमिनी आणि कनक दुर्गा या दोन महिलांनी मंदिरात ऐतिहासिक प्रवेश केला.मंगळवारी म्हणजेच 1 जानेवरीला 1 वाजता त्या शबरीमला टेकडीवर पोहोचल्या. पोलिसांनी दोघींना सुरक्षा पोहोचवली. त्यानंतर त्यांना कोणीच विरोध न केल्याचे मनोरमा न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले. माध्यमांमधून या दोन महिलांच्या मंदिर प्रवेशाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या महिला नक्की कोण आहेत ? त्या काय करतात ? त्यांनी ही योजना कधी आखली ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. या दोन्ही महिला विवाहीत असून कामाला जाणाऱ्या आहेत. मंदिर प्रवेश केल्यापासून त्यांना आणि त्यांच्या परिवाराला धमकी येऊ लागल्या आहेत.

प्राध्यापिका बिंदू 

 बिंदू अमिनी या 42 वर्षाच्या असून कन्नूर विद्यापीठात त्या कायद्या सहायक प्राध्यापिका आहेत. तिचे पती हरिहरन देखील लेक्चरर आहेत. त्यांना 11 वर्षांची मुलगी असून त्यांचा परिवार कोझीकोड येथे राहतो. साधारण 10 वर्षांपूर्वी बिंदू या कानू सान्यालच्या नक्षलवादी संघटनेशी जोडल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ती संघटना सोजली. आता त्या कोणत्याही संघटनेशी संबंधित नाहीत. त्या डाव्या विचाराच्या असून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. बिंदू यांनी कायद्याच्या शिक्षणाची मास्टर डिग्री घेतली. त्यानंतर अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयातून शिकवण्यास सुरूवात केली. यामध्ये कालीकट विद्यापीठाचा देखील समावेश आहे. सध्या त्या कन्नूर विद्यापीठाच्या लोकप्रिय प्रोफेसर आहेत. 

डावी विचारधारा

विद्यार्थी दशेत असताना त्या डाव्या केरळ विद्यार्थी संघटनेशी जोडल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्या बनल्या. संघटनेत केरळच्या सचिव देखील राहिल्या. त्यानंतर राजकारणापासून त्या दूर गेल्या. बिंदू या दलित कार्यकर्त्या देखील असून लोकांमध्ये लैंगिक समानतेबद्दल आग्रही असतात. 

कनकदुर्गा धार्मिक महिला 

 बिंदू सोबत असणाऱ्या कनकदुर्गा या 44 वर्षांच्या असून केरळ राज्य सिविल सप्लाइज कॉर्पोरेशनमध्ये असिस्टंट मॅनेजर आहेत. त्या मलप्पुरमच्या अंगदीपुरममध्ये काम करतात. कनक या खूप धार्मिक आणि आस्था असणाऱ्या असून नेहमी मंदिरात जातात. शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याची त्यांची योजना ऐकल्यावर घरच्यांनी विरोध केला.  केरळच्या नायक या धार्मिक परिवाराशी त्या जोडल्या गेल्या आहेत. कनकचे पती इंजीनियर असून त्या दोन मुलांच्या आई आहेत. केरळात सवर्ण मानल्या जाणाऱ्या नायर समुदायातून त्या येतात. 

24 डिसेंबरला प्रयत्न 

 24 डिसेंबरलाही बिंदू आणि कनकदुर्गा यांनी मंदिर प्रवेशाचा प्रयत्न केला होता. पण कडवट विरोध झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांच्या पतीवर अंगदीपुरम येथील घरावर दक्षीण पंथीयांच्या समूहाने हल्ला केला.

फेसबुकवर ओळख 

 बिंदू आणि कनकदुर्गा यांची ओळख फेसबुकवर झाली. नवोतन केरलम सबरीमालायीलेकु (रेनांसा केरळ) या फेसबुक पेजशी जोडल्या गेल्या आहेत. शबरीमलामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिलांचा हा ग्रुप आहे.