ब्रिटन : ब्रिटनमध्ये एक तरूण 48 मुलांचा बाप बनल्याची घटना समोर आली. त्यामुळे इतक्याशा वयात हा तरूण इतक्या मुलांचा बाप कसा बनला असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
केल गौडी (३१) हा व्यक्ती '48 मुलांचा बाप' बनला आहे. स्पर्म डोनेट करून हा तरूण इतक्या तरूणांचा बाप बनला आहे. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच त्याच्या शुक्राणू दानातून मुलाचा जन्म झाला होता. त्यानंतर त्याने अशाप्रकारे स्पर्म डोनेट करत तो 45 मुलांचा बाप झाला. त्यामुळे आता केल गौडीला 'सिरियल स्पर्म डोनर' असेही म्हणतात.
कशी सुरुवात झाली?
2014 मध्ये पहिल्यांदा केलने कॅलिफोर्निया (यूएसए) मध्ये राहणाऱ्या एका लेस्बियन जोडप्याला त्याचे स्पर्म दान केले होते. इंस्टाग्रामच्या माध्यमातून या ब्रिटीश मुलाच्या आईशी त्याचे संभाषण झाले. त्यानंतर या महिलेने त्याला ब्रिटनमध्ये येण्यास सांगितले.लेस्बियन जोडप्यात, एका महिलेला पूर्वीच्या नातेसंबंधातून मूल होते.या जोडप्याने दुसऱ्या मुलासाठी केलशी संपर्क साधला. केलने त्याच्या घरी गेला आणि एका लहान कपमध्ये स्पर्म दिले. त्यानंतर लेस्बियन जोडप्याने 27 जून रोजी 2 किलो 700 ग्रॅम वजनाच्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर लेस्बियन जोडप्याने केलला फोटोही पाठवले.
व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला
ज्या महिलांनी त्याने शुक्राणू दान केले आहेत. या महिलांचा त्याने व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 40 हून अधिक महिला आहेत.
स्पर्म डोनेट करण्यावर तो काय म्हणाला ?
'सिरियल स्पर्म डोनर' केल गौडी हे व्यवसायाने अकाउंटंट आहेत. गॉडी लॉस एंजेलिस (यूएसए) येथे राहतो. स्पर्म डोनेट करण्यावर तो म्हणतो, जोपर्यंत महिलांना याची गरज आहे तोपर्यंत तो हे करत राहणार आहे. तो पुढे म्हणतो की, डेटिंग आणि रिलेशनशिप त्याच्यासाठी योग्य नाही, त्यामुळे त्याने शुक्राणू दान करण्यास सुरुवात केली.