हिमाचलमध्ये घरावर भूस्खलन, आईच्या कुशीत असलेले मुलांचे मृतदेह पाहून सर्वांनाच अश्रृ अनावर

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार सुरु आहे. आतापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. 

Updated: Aug 21, 2022, 04:52 PM IST
हिमाचलमध्ये घरावर भूस्खलन, आईच्या कुशीत असलेले मुलांचे मृतदेह पाहून सर्वांनाच अश्रृ अनावर title=

मंडी : हिमाचलमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मंडी येथे एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आईने आपल्या मुलांनी  छातीभोवती घट्ट धरुन ठेवलेल्या स्थितीत मृतदेह आढळले आहे. जे पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रृ आले. 

मुसळधार पावसामुळे घरावर भूस्खलन झाल्याने एकाच कुटुंबातील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी जेव्हा घर फोडले तेव्हा त्यांना बेडवर मृतावस्थेत पडलेल्या आईने मुलांना छातीशी धरले होते. मृतांमध्ये गावप्रमुख आणि त्याच्या भावाच्या कुटुंबाचा समावेश आहे. सर्वांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

ज्या घरामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला होता, पोलिसांनी मृतदेह काढण्यासाठी ते घर फोडले तेव्हा त्यांना ही अश्रृ अनावर झाले. बेडवर मृतावस्थेत पडलेल्या आईने मुलांना छातीशी धरले होते. हे दृश्य पाहून सगळेच रडू लागले. मात्र, पोलिसांनी लोकांना तेथे जाण्यापासून रोखले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्यामुळे बचाव पथक वेळेवर पोहोचू शकले नाही. गावकऱ्यांनीही कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणीही वाचवू शकले नाही.

सध्या सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये गावप्रमुख खेम सिंग आणि त्याच्या लहान भावाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे त्यांच्या घरावर भूस्खलन झाले. त्यामुळे घरात उपस्थित 8 जीव ढिगाऱ्यातच गाडले गेले.

शुक्रवारी रात्री 2 वाजता ही घटना घडली. त्यावेळी घरात प्रधान खेम सिंग, पत्नी, मुले, त्यांची वहिनी, भावाची दोन मुले आणि सासरे उपस्थित होते. झाडोन गावातील या घटनेचे भीषण दृश्य पाहून सर्वांचे डोळे भरून आले. ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह शोधण्याचा प्रयत्न प्रशासकीय कर्मचारी करत असताना शेकडो लोकांचे डोळे ढिगाऱ्याखाली दबलेले सर्व जण सुखरूप बाहेर येण्याची वाट पाहत होते. पण देवाला काही वेगळेच मंजूर होते. पहाटे ३ वाजता सुरू झालेले बचावकार्य दुपारी १ वाजता संपल्यानंतर ढिगाऱ्यातून पलंगावर पडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.

प्रथम प्रधान खेम सिंग यांच्या भावाच्या पत्नी आणि मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर प्रधान आणि त्यांच्या पत्नीचे मृतदेह सापडले. यानंतर प्रधान यांची दोन मुले सापडली आणि अखेर प्रधान यांच्या सासऱ्याचा मृतदेह ढिगाऱ्यात आढळून आला. 8 जणांच्या मृत्यूनंतर कुटुंबासह ग्रामस्थांचीही दुरवस्था झाली आहे.