वंदे मातरम अपमान प्रकरणी तेजस्वी यादव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल

तेजस्वी यादव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते आहेत. वंदे मातरम या गिताचा अपमान केल्याचा आरोप यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Updated: Aug 17, 2017, 06:37 PM IST
वंदे मातरम अपमान प्रकरणी तेजस्वी यादव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल title=

नवी दिल्ली : तेजस्वी यादव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते आहेत. वंदे मातरम या गिताचा अपमान केल्याचा आरोप यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात तेजस्वी यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १२४ (अ), १२० (ब), ५०१ (ब) प्रिवेंशन ऑफ इंसल्ट टू नेशनल ऑनर एक्ट 69 (१९७१) अन्वये यादव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनता दल युनायटेडचे नेते इकबाल अन्सारी यांनी न्यायालयात खटला दाखल करताना म्हटले आहे की, तेजस्वी यादव यांनी १३ ऑगस्ट २०१७ रोजी वंदे मातरम या गिताबद्धल अपमनजनक ट्विट केले. या ट्विटमुळे राष्ट्रप्रेमी भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.

१३ ऑगस्ट २०१७ रोजी तेजस्वी यादव यांनी 'सही कहा इनका "वंदे मातरम्" = बंदे मारते है हम', अशा प्रकारचे ट्विट केले होते. वास्तवात एका पत्रकाराने केलेल्या ट्विटला रिट्विट करताना तेजस्वी यादव यांनी या शब्दांचा वापर केला होता.