दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे रविवारी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 24, 2017, 08:40 PM IST
दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा  title=
Representative Image

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी येथे रविवारी सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

उरी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता. दहशतवाद्यांचा हा कट भारतीय जवानांनी उधळून लावला आहे.

भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी उरी परिसरात शिरकाव केल्याची माहिती मिळताच परिसराला घेरलं आणि तपास सुरु केला. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला या गोळीबाराला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

या कारवाई दरम्यान, एक जवान जखमी झाला आहे. तसेच तीन नागरिकही जखमी झाले आहेत. पोलीस महानिरीक्षक एस पी वैद्य यांनी माहिती दिली की, गेल्या वर्षी झालेल्या उरी हल्ल्याप्रमाणेच हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.