एकदाच Premium भरा, चिंतामुक्त व्हा! अवघ्या 20 रुपयांमध्ये 'या' सरकारी योजनेतून व्हा मालामाल

आपल्या देशात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुम्हाला विमा योजना (Insurance Policy) प्राप्त करून देतात. तशीच ही एक सरकारी योजना आहे. तुम्ही या योजनेतून 20 रूपयांपर्यंत तुमच्या परिवारासाठी मदत घेऊ शकतात.

Updated: Nov 9, 2022, 08:20 AM IST
एकदाच Premium भरा, चिंतामुक्त व्हा! अवघ्या 20 रुपयांमध्ये 'या' सरकारी योजनेतून व्हा मालामाल title=

Pradhanmatri Suraksha Bima Yojna: सध्या आपल्या गरजा फारच वाढल्या असून आपल्याला कायमच पैशांची चणचण भासते आहे. त्यामुळे आपण एकतर आपला खर्च कमी करायचा प्रयत्न करतो अन्यथा आपण आपल्या मिळालेल्या पैशांचा साठा तरी करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण जितकं होईल तितकं पैशांचा वापर योग्य पद्धतीनं करायचा प्रयत्न करतो. वायफळ खर्च करण्यापेक्षा आपला कायम हाच मानस असतो की आपला पैसा हा योग्य ठिकाणी सुरक्षित राहिला पाहिजे. यासाठी अनेक खाजगी आणि सरकारी (Government Policies) योजनाही उपलब्ध असतात. आता आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पैशांची बचत आणि सुरक्षाही करता येईल. (secure your family's future in 20 rupees pay premium once a year government will give 2 lakh rupees)

ही योजना आहे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना. सर्वप्रथम जाणून घेऊ या योजनेबद्दल. आपल्या देशात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या तुम्हाला विमा योजना  (Insurance Policy) प्राप्त करून देतात. तशीच ही एक सरकारी योजना आहे. तुम्ही या योजनेतून 20 रूपयांपर्यंत तुमच्या परिवारासाठी मदत घेऊ शकतात. जर तुमच्या बाबतीत काही दुर्घटना घडली तर तुम्ही तुमच्या परिवारासाठी मदत घेऊ शकता. पण या प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत तुम्हाला 2 लाख पर्यंत इन्शुरन्स मिळू शकतो. तेव्हा जाणून घेऊया यातून तुम्हाला नक्की कसा आणि काय फायदा होऊ शकतो. 

पात्रता काय ? (what is the eligibility)

18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते. या योजनेअंतर्गत त्या व्यक्तीला फक्त एकदाच प्रिमियम (Premium) भरवा लागतो. हा प्रिमियम ऑटो डेबिडेट आहे. म्हणजे जर तुम्ही ही 2 लाखांची पॉलिसी 20 रूपयांना विकत घेतलीत तर तुमच्या खात्यातून वर्षातून एकदा म्हणजे समजू 31 मे रोजी तुमच्या खात्यातून पैसे काढले जातील. जे 20 रूपये कापले जातील. ही पॉलिसी 1 जून ते 31 मेपर्यंत वैध आहे. जेव्हा तुमचा एकदा प्रिमियम कापला जातो तेव्हा पुढच्या वर्षीच्या तुमची योजना परत रिन्यू केली जाते. 

अर्ज कसा कराल? (how to apply)

या सरकारी योजनेत अशा अनेक कंपन्या, ज्या खाजही आणि सरकारी आहेत त्या तुम्हाला चांगली रक्कम देतात. तेव्हा तुम्ही या योजनेच्या संकेतस्थळावर (Website) जाऊन नोंदणी करू शकता. तुम्हाला यात व्यवस्थित मदत हवी असल्यास विमा एजंटशीही तुम्ही संपर्क साधू शकता. 

कोणत्या गोष्टी आहेत आवश्यक? (what documents needed)

पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचा/तिचा नॉमिनी विमा कंपनी/बँकेशी संपर्क होऊन ती व्यक्ती विम्याच्या रकमेवर दावा करू शकतो. यासाठी त्या व्यक्तीली पॉलिसीधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, आधार कार्ड, नॉमिनीचे (Nominee) आधार कार्ड सादर करावे लागेल. पॉलिसीधारकला अपंगत्व असल्यास त्याला/तिला हॉस्पिटलची कागदपत्रे आणि आधार कार्ड सादर करावे लागेल. लक्षात ठेवा की हे सर्व तुम्हाला 30 दिवसांच्या आत पुर्ण करायचं आहे.