एका चिप्ससाठी चोरीचा डाव, या अजब चोरीला तुम्ही काय म्हणाल, पाहा व्हिडीओ

दुकानात अजब चोरी, या चोराला तुम्ही काय शिक्षा द्याल? पाहा व्हिडीओ

Updated: Jul 29, 2021, 06:21 PM IST
एका चिप्ससाठी चोरीचा डाव, या अजब चोरीला तुम्ही काय म्हणाल, पाहा व्हिडीओ title=

मुंबई: चोर साधारण पैसे किंवा सोनं चांदी घेऊन जाण्यासाठी दुकानात चोरी करतो. फार कमीवेळा चोरी ही एखाद्या वस्तूची होत असते. पण एक अजब गजब प्रकार दुकानात घडला आहे. चोरीनं चक्क दुकानातील एखादी मोठी वस्तू नाही तर चिप्सचं पाकीट चोरून फरार झाला आहे. या चोराला असं वाटलं की आपल्याला कोणीचं पाहाणार नाही मात्र त्याची ही चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

आतापर्यंत तुम्ही माणसाला चोरी करताना पाहिलं असेल पण आता चक्क एका पक्षानं चोरी केली आहे. या पक्षी चिमणी किंवा कावळा नाही तर चक्क चोरी करणारं एक बदक आहे. हे बदक लपून छपून नाही तर बिनधास्त दरवाजातून आत घुसलं. त्याने रॅकमधील चिप्सचं पाकीट चोचीत पकडलं आणि पळून गेला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कदाचित या बदकालाही चिप्स खाण्याचा मोह आवरला नसावा. 

हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रश्न असा आहे की या चोराला पकडणार तरी कसं आणि शिक्षा तरी काय देणार? हा पक्षी चिप्सचं पाकीट घेऊन थेट पळ काढतो पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुकाना बाहेर दुसरं बदक त्याची वाट पाहात असतं. ते दोघंही एकत्र हे चिप्सचं पाकीट घेऊन पळून जातात. 

या पक्षांच्या अजब चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत 264.7 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हे पक्षी खूप स्मार्ट आहेत असं अनेक युझर्सनी म्हटलं आहे. 15 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातल आहे.