September 2024 Holidays list: प्रत्येक महिना सुरु झाला की विद्यार्थी आपल्या शालेय डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत? याचा शोध घेत असतात. सप्टेंबर महिना हा अनेक सण घेऊन आलाय. त्यात मुलांच्या लाडक्या बाप्पाचं आगमनदेखील याच महिन्यात आहे. सप्टेंबरमध्ये ईद देखील आहे. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. या सुट्ट्यांनुसार विद्यार्थ्यांच्या पालकांनादेखील त्यांच्या सुट्ट्या मॅनेज करता येणार आहेत. कारण सुट्ट्यांचे दिवस एकत्र करुन अनेक कुटुंबा आपल्या गावी किंवा शहराबाहेर फिरण्याचे प्लान आखतात. त्यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नेमक्या किती दिवस सुट्ट्या असणार, याची यादी जाणून घेऊया. सप्टेंबर 2024 मध्ये शाळा आणि कॉलेज खुले राहणार आहेत. पण सण आणि सुट्ट्यांमुळे त्यांना आपल्या आवडत्या कांमासांठी वेळ काढता येणार आहे. शाळा, कॉलेजच्या सुट्ट्या या देशभरातील विविध राज्य, क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थानुसार वेगवेगळ्या असतील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्या.
ओणम हा हिंदु धर्मातील महत्वाचा सण असून तो केरळमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 5 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना शाळेची सुट्टी आहे. केरळवासियांसाठी हा एक प्रमुख वार्षिक उत्सव आहे. हा या राज्याचा अधिकृत सण असून यावेळी राज्यभरात अनेक सास्कृतिक कार्यक्रम होतात. गणेश चतुर्थी हा देशातील विविध भागात साजरा केला जाणारा सण आहे. प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जाईल. पुराणानुसार याच दिवशी श्रीगणेशाचा जन्म झाला होता.
ईद ए मिलाद किंवा मीलाद उन नबी इस्लाम धर्म मानणाऱ्यांसाठी मोठा सण आहे. 16 सप्टेंबर रोजी ईदची सुट्टी आहे. शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.
शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी उत्तर भारतात हरतालिकेची सुट्टी असेल. 7 सितंबर 2024, शनिवार रोजी संपूर्ण भारतात गणेश चतुर्थीची सुट्टी असेल. 13 सितंबर 2024, शुक्रवारी राजस्थानमध्ये रामदेव जयंती असेल.14 सितंबर 2024, शनिवारी केरळात ओणमची सुट्टी असेल. 16 सितंबर 2024, सोमवारी पूर्ण भारतात ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. 16 सितंबर 2024, सोमवारी उत्तर भारतात विश्वकर्मा जयंतीची सुट्टी असेल.
याव्यतिरिक्त शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारची हक्काची सुट्टी मिळेल. 1 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 22 सप्टेंबर आणि 29सप्टेंबर रोजी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेची सुट्टी असेल.