मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी शनिवारी सूचना केली आहे. या सूचनेत बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना तातडीने आपल्या खात्याची केवायसी (KYC)अपडेट करायला सांगितली आहे. जे लोक केवायसी अपडेट करणार नाहीत त्यांचे खाते बंद करण्यात येणार आहे.
SBIने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून सूचना जारी केली आहे. 'ग्राहकांना बँकिंग सेवा कोणत्याही अडथळ्याविना सुरू ठेवायची असेल, तर 31 मे 2021 पर्यंत KYC अपडेट करणे गरजेचे ठरेल. यासाठी ग्राहकांनी आपल्या होम ब्रांच किंवा जवळच्या SBI ब्रांचमध्ये जाणे क्रमप्राप्त आहे. ज्या खातेधारकांची KYC अपडेट होणार नाही. त्यांचे बँकेचे खाते गोठवण्यात येणार आहे'
Important announcement for our customers in view of the lockdowns in place in various states. #KYCUpdation #KYC #StayStrongIndia #SBIAapkeSaath #StaySafe #StayStrong pic.twitter.com/oOGxPcZjeF
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 1, 2021
घरबसल्या करू शकता KYC
जे लोक KYC करण्यासाठी कोरोनाच्या निर्बंधांमुळे जाऊ शकत नाही. त्यांनी SBIब्रांचला पोस्ट किंवा ई मेलवर आपले डॉक्युमेंट पाठवावेत. केवासी पूर्ण झाल्यास ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर SMS पाठवला जाईल