कार, किरकोळ कर्ज घेणाऱ्यांना खुशखबर

कार लोन, पर्सनल गोल्ड लोन आणि इतर पर्सनल लोनवरील प्रोसेसिंग फीमध्ये १०० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 1, 2017, 05:35 PM IST
कार, किरकोळ कर्ज घेणाऱ्यांना खुशखबर title=

मुंबई :  कार, किरकोळ कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण स्टेट बँकेने (एसबीआय) या कर्जदारांसाठी विशेष सवलत दिली आहे. या बॅंकेतर्फे प्रोसेसिंग फीमध्ये मोठी सूट देण्यात आली आहे. कार लोन, पर्सनल गोल्ड लोन आणि इतर पर्सनल लोनवरील प्रोसेसिंग फीमध्ये १०० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. स्टेट बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात यासंबंधीची माहिती दिली आहे. 

ही कर्जमाफी इतर बँकांच्या गृहकर्जाला टेकओव्हर केल्यानंतर मिळणाऱ्या सुटीव्यतिरिक्त असणार आहे.

‘फेस्टिवल बोनान्झा’

ग्राहकांना मिळणार असेलेली ही ऑफर‘फेस्टिवल बोनान्झा’चा एक भाग आहे. जे ग्राहक ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत कार लोनसाठी अर्ज करतील यांनाच याचा फायदा मिळणार आहे. अर्ज केलेल्यांना कर्जावरील प्रोसेसिंग फी माफ केली जाणार आहे.

५० टक्क्यांपर्यंतची सूट 

स्टेट बँकेने ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंतच्या पर्सनल गोल्ड लोनच्या प्रोसेसिंग फीवर ५० टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली आहे.  ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत ग्राहक एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोनवरील प्रोसेसिंग फीमध्ये ५० टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहेत.