SBI बँकेचा ग्राहकांना अलर्ट, फसवणूक टाळण्यासाठी एवढंच करा

SBIने आपल्या ग्राहकांना फसवणूक टाळण्याबाबत अलर्ट जारी केला आहे. याबाबत बँकेने ट्विट करत सावधानीचा इशारा दिला आहे. 

Updated: Feb 27, 2021, 01:58 PM IST
SBI बँकेचा ग्राहकांना अलर्ट, फसवणूक टाळण्यासाठी एवढंच करा  title=
संग्रहित छाया

मुंबई : SBIने आपल्या ग्राहकांना फसवणूक टाळण्याबाबत अलर्ट जारी केला आहे. याबाबत बँकेने ट्विट करत सावधानीचा इशारा दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने UPI च्या जवळपास 44 कोटींहून अधिक ग्राहकांना फसवणूक होण्यापासून सावध केले आहे. UPI मार्फत खात्यातून पैसे डेबिट करण्याचा एसएमएस अलर्ट तुम्हाला मिळाला नाही तर सावध राहा, असेही बँकेने सांगितले. अनेक ठिकाणी फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे SBI आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे, तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमची फसवणूक होईल. (SBI : Cyber Crime and Online Scam, Follow these tips and be alert!)

SBI ने आपल्या ग्राहकांना बँकेच्या सूचनांचे पालन करा आणि सावध व्हा, असे म्हटले आहे. SBI ने ट्विट करून आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क केले आहे. जर यूपीआय (UPI) व्यवहार तुमच्याकडून झालेला नसेल आणि पैशांच्या डेबिटसाठी तुम्हाला एसएमएस मिळाला असेल तर प्रथम यूपीआय (UPI)सेवा बंद करा. यूपीआय सेवा बंद करण्यासंबंधी बँकेने माहिती दिली आहे. ऑनलाईन फसवणूक होण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे एसबीआय वेळोवेळी ग्राहकांना सतर्क करत आहे.  (SBI Warns Customer Against UPI Fraud Follow These Tips And Be Alert)

दरम्यान, याआधी SBI बँकेने ग्राहकांना त्वरित कर्ज अ‍ॅपसाठी सतर्क केले होते. कोणतीही कागदपत्रे न देता आपल्याला फक्त दोन मिनिटांत कर्ज उपलब्ध देण्यात येईल, असे एसएमएस येतात. किंवा अॅपच्यामाध्यमातून सांगण्यात येते. मात्र, बँकेकडून असे काहीही सांगण्यात आलेले नाही. दोन मिनिटांत कर्जाचा दावा करणारे कोणतेही त्वरित कर्ज अॅप टाळा. बऱ्याचदा लोक या प्रकारे कर्ज घेतात, परंतु नंतर त्यांना मोठा व्याजदर द्यावा लागतो, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे बँकेने ग्राहकांची फसवणूक होण्यापासून अलर्ट केले आहे.

फसवणूक टाळण्यासाठी बँकेने UPI सेवा बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800111109 वर कॉल करून ग्राहक यूपीआय सेवा थांबवू शकतात किंवा आपण आयव्हीआर नंबर 1800-425-3800 / 1800-11-2211 वर देखील कॉल करुन ही सेवा बंद करु शकता. तसेच आपण https://cms.onlinesbi.sbi.com/cms/ वर आपली तक्रार नोंदवू शकता. किंवा 9223008333 या क्रमांकावर एसएमएस पाठविला तर आपली सेवा बंद होऊ शकते.