1 जुलैनंतर ATM मधून कॅश काढणं महागणार, बँकांचे नियम बदलणार

ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी   

Updated: Jun 27, 2021, 11:55 AM IST
1 जुलैनंतर ATM मधून कॅश काढणं महागणार, बँकांचे नियम बदलणार  title=

मुंबई : SBI ATM New Rule : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासोबत अत्यंत महत्वाची आहे. SBI बँकेने आपल्या महत्वाच्या नियमांमध्ये बदल केला आहे. (SBI customers ALERT: State Bank of India rules for cash withdrawal from ATM, branch to change 1st July 2021 ) स्टेट बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे नवे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहे. ATM मधून Cash Withdrawal आणि चेकबुक (Cheque Book) चा वापर करणं महागात पडणार आहे. 

सर्विस चार्जमध्ये झाला बदल 

1 जुलै 2021 ला देशातील सगळ्या SBI च्या बँकेत मोठा बदल होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ATM आणि बँक सर्विसच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यामुळे आता ATM आणि बँक ब्रांचमधून पैसे काढण्यावर सर्विस चार्जमध्ये फेरबदल केले आहेत. 

SBI ची अधिकृत वेबसाइट ही माहिती दिली आहे. यामध्ये नवे चार्जेस लावण्यात येणार आहेत. चेकबुक, ट्रान्सफर आणि इतर नॉन फाउनॅनशिअल देवाण-घेवाणीवर अधिक चार्जेस लागू करण्यात आले. बँकनुसार हे सर्व बदल 1 जुलै 2021 रोजी होणार होते.  

ATM मधून पैसे काढणे महागणार 

SBI च्या BSBD ग्राहकाला चार वेळी पैसे काढण्यासाठी मोफत आहे. मात्र फ्री लिमिट संपल्यानंतर बँक ग्राहकांकडून काही अधिकचे पैसे आकारणार आहे. 1 जुलैनंतर ATM मधून रोख रक्कम काढल्यानंतर 15 रुपयांसोबत जीएसटी चार्ज देखील लागू होणार आहे. 

कोरोना संकटाच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांना दिलासा देण्याकरता रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. ग्राहक आपल्या बचत खात्यामधून दुसऱ्या ब्रांचमध्ये जाऊन रोख रक्कम विड्रॉल फॉर्म भरून 25000 रुपयांपर्यंत काढू शकतात. आणि चेकमधून दुसऱ्या ब्रांचमधून 1 लाख रुपये काढण्याची परवानगी मिळाली आहे. 

स्टेट बँकेच्या सर्विस चार्जमध्ये बदल झाले

1. एसबीआय BSBD अकाऊंट होल्डर्स एका फायनान्शिअर इअरमध्ये 10 चेक कॉपी मिळणार आहे. आता 10 चेक करता चेकबुक करता चार्जेस द्यावे लागणार आहे. 10 चेक करता 40 रुपये आणि सोबत जीएसटी मोजावे लागणार आहे. 

2. इमरजेंसीच चेक बुकवर 10 चेक करता 50 रुपये आणि जीएसटी द्यावं लागणार आहे. 

3. 25 चेक लीवकरता 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करावे लागणार आहे. 

4. वरिष्ठ नागरिकांना चेक बुकपर नवे सेवा शुल्क सूट दिली आहे. 

5. बँक BSBD खातेधारकांद्वारे घर आणि अन्य बँकांतून पैसे काढण्यास शुल्क लागणार नाही.