मुंबई : देशातील अनेक मोठ्या बँकांनी अलीकडेच MCLR वाढवले आहे. जर तुम्ही गृहकर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल तर MCLR वाढल्याचा परिणाम तुमच्या कर्जाच्या हफ्त्यांवर होऊ शकतो. याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल. जाणून घ्या कोणत्या बँकांनी व्याजदर वाढवले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सोमवारी MCLR 10 बेस पॉइंट्स (0.10 टक्के) ने वाढवला होता. यानंतर बँकेची सर्व प्रकारची कर्जे महाग झाली.
बँक ऑफ बडोदा (BoB) ने देखील 12 एप्रिलपासून व्याजदरात 0.05 टक्के वाढ केली आहे. यामुळे तुमच्या कर्जाचा EMI पूर्वीपेक्षा जास्त असेल.
एक्सिस बँकेनेही आपले कर्ज महाग केले आहे. बँकेने MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. वाढलेले व्याजदर 18 एप्रिलपासून लागू झाले आहेत.
कोटक महिंद्रा बँकेनेही MCLR वाढवून ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने वाढवलेले दर 16 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत.
MCLR म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2016 मध्ये MCLR प्रणाली सुरू केली होती. हा कोणत्याही वित्तीय संस्थेचा अंतर्गत बेंचमार्क आहे. MCLR प्रक्रियेत, कर्जासाठी किमान व्याजदर निश्चित केला जातो.