मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक SBIने अनेक स्किम लॉंच केल्या आहेत. ज्यामध्ये पैशांची गुंतवणूक करून तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. SBI Mutual Fund देशातील सर्वात मोठी एसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. SBI म्युचुअल फंडद्वारा स्किम चालवण्यात येत आहे. ज्याचे एक्सपोजर इक्विटीसोबच डेट सुद्धा आहे. SBI Mutual फंड वर गुंतवणूकदारांचा विश्वास आहे.
एसबीआय म्युचुअल फंडमध्ये अनेक स्किम्स अशा आहेत की ज्यांनी, गुंतवणूकदारांना 50 ते 70 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहे. तसेच 5 वर्षात गुंतवणूकदारांचा पैसा 3 पट वाढला आहे.
SBI Bluechip Fund
1 वर्षात रिटर्न 53 टक्के
या फंडने 1 वर्षात 52 .67 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच 5 वर्षात या फंडचा रिटर्न 14 टक्के राहिला आहे. या स्किममध्ये कमीत कमी 5000 रुपये गुंतवता येतात. तसेच कमीत कमी 500 रुपयांची SIP सुरू करता येते.
SBI Large & Midcap Fund
1 वर्षात 60 टक्के रिटर्न
या फंडने लार्ज आणि मिडकॅपमध्ये 1 वर्षात 60 टक्के रिटर्न दिला आहे. 5 वर्षात 15 टक्के वार्षिक या हिशोबाने रिटर्न दिला आहे. या स्किममध्ये कमीत कमी 5हजार तर SIP कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करता येते.
SBI Small Cap Fund
1 वर्षात 70 टक्के रिटर्न
या स्मॉल कॅप फंडने 1 वर्षात 60 टक्के रिटर्न दिला आहे. 5 वर्षात 23 टक्के वार्षिक या हिशोबाने रिटर्न दिला आहे. या स्किममध्ये कमीत कमी 5 हजार तर SIP कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करता येते.
SBI Flexicap Fund
1 वर्षात रिटर्न 53 टक्के
SBIफ्लेक्सीकॅप फंडचे 1 वर्षाचे रिटर्न 57 टक्के होते. तर 5 वर्षात वार्षिक 16 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या स्किममध्ये 1000 रुपयांची कमीत कमी गुंतवणूक करता येते तर, 500 रुपयांची कमीत कमी SIP सुरू करता येते.
SBI Focused Equity Fund
1 साल में रिटर्न: 53%
या फंडने 1 वर्षात 55 टक्के रिटर्न दिला आहे. तर 5 वर्षात वार्षिक 18 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या स्किममध्ये 5000 रुपयांची कमीत कमी गुंतवणूक करता येते तर, 500 रुपयांची कमीत कमी SIP सुरू करता येते.